शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

खोपोली निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By admin | Published: July 19, 2016 2:41 AM

खोपोली नगरपालिकेच्या २९ जागांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर आली आहे.

खालापूर : खोपोली नगरपालिकेच्या २९ जागांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या खोपोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून, अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने गेली पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ता टिकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे खोपोलीत १३ नगरसेवक असून, नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. विकासकामांच्या नावाने बोंबच असल्याने मतदारांना अन्य पक्षांचा पर्याय समोर आहे. खालापूरमध्ये चमत्कार करणाऱ्या शेकापक्षाला यामध्ये अधिक संधी असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. शिवसेना, भाजपा, आरपीआय, मनसे, काँग्रेस या पक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीकडेही लक्ष राहणार असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.खोपोली नगरपालिकेच्या नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर साऱ्यांनाच वेध लागले आहेत. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचे भाजपा, शिवसेना सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगराध्यक्ष जनतेमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. या अगोदर खोपोलीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्या दृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली असतानाच शासनाने नगराध्यक्ष जनतेमधून निवडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोपोलीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राहील, असा विश्वास असल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, अनेकांनी जोरदार संपर्क मोहीमही सुरू केली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण राहिले तर राष्ट्रवादीकडून पुन्हा विद्यमान नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर रिंगणात राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख सुनील पाटील, काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल, शेकापकडून विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे यांच्या नावांची चर्चा आहे.खोपोलीचा विकास रखडल्याने विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा असंतोष आहे. तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे व आ. सुरेश लाड यांनी खोपोलीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असतानाही खोपोलीत एकही मोठे काम उभे राहिलेले नाही. नाट्यगृहाची इमारत पूर्णत्वाकडे असली तरी अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. सध्या या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.खालापूरमध्ये मतदारांनी शेकापक्षाला पूर्ण बहुमत दिले आहे. गेली पाच वर्षे विरोधी पक्षात असलो तरी आम्ही केलेली विकासकामे लोकांसमोर आहेत. आमदार जयंत पाटील यांचे खोपोलीशी वेगळे नाते आहे. त्यामुळे खोपोलीकर शहराचा विकास करण्यासाठी शेकापला पूर्ण बहुमत देतील, असा विश्वास असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- तुकाराम साबळे,विरोधी पक्षनेते, खोपोली नगर परिषद