मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पासाठी विधानभवन, मनोरा आमदार निवासाजवळील काही जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तातडीने हस्तांतरित करण्याचा आदेश आज सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला. या जागांमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह विविध राजकीय पक्षांच्या व सरकारी कार्यालयांचा समावेश आहे. ही जागा मेट्रोसाठी पाच वर्षांकरता ताब्यात घेतली जाईल. तोवर पक्ष कार्यालये आणि शासकीय कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. शेकाप, रिपब्लिकन पक्ष, सपा आदींची कार्यालयेदेखील या भागात आहेत. विधानभवनासमोरील एक भूखंडदेखील मेट्रोसाठी उपयोगात आणला जाणार आहे. मेट्रो ३ चे प्रवेशद्वार म्हणून या परिसराचा वापर करण्यात येणार आहे. पाच वर्षांनंतर राजकीय पक्षांची कार्यालये पुन्हा या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
राजकीय पक्षांची कार्यालये मेट्रो ३ साठी हलविणार
By admin | Published: July 17, 2016 5:36 AM