शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

दिग्गजांना ‘राजकीय’ धक्का

By admin | Published: February 24, 2017 2:30 AM

सर्वांच्या उत्कंठेचा विषय बनलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा ७५ गट व १५० गणांचा निकाल आज जाहीर

पुणे : सर्वांच्या उत्कंठेचा विषय बनलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा ७५ गट व १५० गणांचा निकाल आज जाहीर झाला आणि अनेकांना धक्का बसला. कुठे विजयाचे दावे सपशेल फोल ठरले तर कुठे राजकीय पक्षांनी जोरदार मुसंडी घेत प्रस्थापितांना हलवून सोडले. कुठे नव्याने राजकारणात उतरलेल्यांनी विक्रमी विजय संपादन केले, तर कुठे प्रत्यक्ष विद्यमान आमदारांच्या पुत्रांना आणि त्यांच्या पुरस्कृत उमेदवारांनादेखील पराभवाची धूळ चाखावी लागली. निवडणुकीचा निकाल सर्वांनाच सर्वार्थाने 'जोर का झटका' देणारा ठरला.बारामतीत राष्ट्रवादीच, कमळ फुललेच नाहीबारामती : तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. भाजपाने निवडणूक प्रचाराच्या काळात तीन गटांत चांगलीच आघाडी घेतली होती. त्यामुळे तालुक्यात भाजपाला संधी मिळणार, अशी चर्चा होती. परंतु, सुपा-मेडद वगळता अन्य कोणत्याही गटात लढत दिसली नाही. या गटातील सुपा गणातदेखील चुरशीची लढत झाली. परंतु, २९९ मतांनी राष्ट्रवादीला विजय मिळविता आला. हा अपवाद वगळता अन्य सर्व गट, गणांत भाजपाचे पानिपत झाले. ६ गट आणि १२ पंचायत समिती गणांच्या जागा राष्ट्रवादीने एकहाती जिंकल्या. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पहिल्यांदाच भाजपाने तगडे आव्हान दिल्याने मतमोजणीची उत्सुकता वाढली होती. मतदानानंतर तालुक्यातील तीन गट भाजपाकडे जातील, असा विश्वास विरोधकांना होता. परंतु शेवटच्या तीन दिवसांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तालुका पिंजून काढला. अजित पवारांचे पुतणे जिंकले!शिर्सुफळ- गुणवडी गटातून रोहित राजेंद्र पवार यांनी विक्रमी मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी तब्बल १२ हजार ८७९ इतक्या विक्रमी मतांनी भाजपाचे संदेश कृष्णराव गावडे यांचा दारुण पराभव केला. त्यांना ६ हजार ७३८ मते मिळाली. रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारण सुरू केले. त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देखील नव्हता. त्याचबरोबर संपूर्ण गटात घराघरात जावून त्यांनी केलेला प्रचार विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यास महत्त्वपूर्ण ठरला.खेड तालुक्यात दिलीप मोहितेंना धक्काराजगुरुनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत आमदार सुरेश गोरे यांनी जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीवर सात सदस्य निवडून आणून विधानसभेचा निकाल केवळ चमत्कार नव्हता हे सिद्ध केले. भाजपानेही मुसंडी मारत दोन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण खेचून आणले. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांमध्ये विजय मिळाला. काँग्रेसनेही एका गणात विजय मिळवित तालुक्यातील आपले अस्तित्व जिवंत ठेवले. अत्यंत उत्कंठावर्धक आणि उत्सुकता निर्माण झालेल्या खेड तालुक्यातील निकालामध्ये राष्ट्रवादीच्या दृष्टीने धक्कादायक निकाल लागले. राहुल कुल यांचा उडाला धुव्वा! दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले तर सत्ताधारी रासपाचे आमदार राहुल कुल यांचा धुव्वा उडावून दारुण पराभव झाला. भाजपा, शिवसेना,काँग्रेस, बसपा यांना मात्र जनतेने नाकारल्याने या पक्षाच्या उमेदवारांना एकही जागा मिळाली नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान रमेश थोरात जिंदाबाद या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला होता. बारामतीत भाजपाच्या तुल्यबळ उमेदवारांचा पराभवबारामती : बारामती तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या ६ गणांवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाच्या तुल्यबळ उमेदवारांनाही पराभव स्वीकारावा लागला.शिर्सुफळ-गुणवडी गटातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. माळेगाव-पणदरे गटातील राष्ट्रवादीच्या रोहिणी तावरे यांनी भाजपाच्या विजया रंजनकुमार तावरे यांचा ८ हजार ६४० मतांनी पराभव केला. त्याचप्रमाणे सुपा-मेडद गटातील राष्ट्रवादीच्या भारत खैरेंनी भाजपाचे उमेदवार व पुणे बाजार समितीचे दिलीप खैरे यांचा धक्कादायक पराभव केला. भारत खैरे यांनी दिलीप खैरे यांचा २ हजार ३४१ मतांनी पराभव केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता बारवकर (सुपा), शारदा खराडे (मेडद), लीलाबाई गावडे (शिर्सुफळ), भरत गावडे (गुणवडी), संजय भोसले (माळेगाव बुद्रुक) आदींनी पंचायत समिती गणातून विजय मिळविला.मुळशीत भाजपा-काँग्रेसला भोपळा : मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर जि.प.गटात तीन पैकी १ जागा सेनेकडे तर २ जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या आहे. कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत सकाळी बरोबर १० वाजता एकूण २८ टेबलवर सर्व गट गणाची एकाचवेळी सुरु झालेली मतमोजणी बरोबर ११.३० वाजता संपली. २०१२ च्या निवडणुकीत पंचायत समितीत सहा पैकी ५ जागेवर राष्ट्रवादीचे उमेद्वार तर १ जागा कॉंग्रेस पक्षाकडे होती व जि.प. ३ गटापैकी २ जागी राष्ट्रवादी तर १ जागा सेनेकडे होती. यावेळी शिवसेनेने पंचायत समितीत मुसंडी मारत १ जागा अधिक घेतली तर जि.प.गटात १ जागा कायम ठेऊन आपला आलेख उंचावता ठेवला.पुरंदरला प्रथमच फडकला भगवापुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या बहुरंगी निवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे मुसंडी मारून जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीत बहुमत मिळवून ६ जागा जिंकून भगवा फडकावला आहे. तर, काँग्रेसने बेलसर-माळशिरस गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या आहेत. पुरंदर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेची सलगी त्यांना भोवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पार सफाया झाला.वेल्ह्यात कॉँग्रेसची एकहाती सत्तामार्गासनी : वेल्ह्यात एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा एकदा कॉँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. सहापैकी पाच जागांवर विजय मिळविला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकरांनी आपले अस्तित्व कायम ठेवत अपक्ष म्हणून एक जागा मिळविली आहे. अंतर्गत कुरघोडींमुळे वेल्ह्यातून राष्ट्रवादी पुन्हा एकदा हद्दपार झाली आहे.हर्षवर्धन पाटील यांच्या  मातोश्री सर्वाधिक मतांनी विजयीइंदापूर तालुक्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचारसभेत हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्रींच्या वयाचा मुद्दा वादग्रस्त केला होता. मात्र त्या मुद्द्याकडे साफ दुर्लक्ष करून बावडा लाखेवाडी गटातील मतदारांनी यंदाच्या वर्षात सर्वाधिक मताधिक्याने हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील यांना निवडून दिले.अन अवघ्या एक मताने निवडून आलेओझर : शेवटपर्यंत उत्कंठा लागुन राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या आळे-पिपळवंडी गटामधे अखेर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शरद लेंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे मंगेश काकडे यांच्यावर अवघ्या एक मताने विजय मिळविला.निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून हा निर्णय घोषीत केला. शिवसेनेच्या आशाताई बुचके व तालुका अध्यक्ष माउली खंडागळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांना हा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले, की तुम्ही या निकालाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागू शकता. हा निकाल राखून ठेवला होता. शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांच्यावतीने आनंद रासकर यांनी टपाली मतदानातील मतपत्रिका बाद करण्याबाबत आज केला होता. लेंडे यांना सायंकाळी सात वाजता विजयी घोषीत केले. या गटामध्ये आमदार शरद सोनावणे यांचे बंधू शशिकांत सोनावणे यांना पराभवाचा धक्का बसला. बाबूराव पाचर्णेंच्या मुलाचा पराभव शिरुर : मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील जनतेने भाजपाला नाकारल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. अगदी भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांना शिरूर-ग्रामीण न्हावरे या हक्काच्या जि. प. गटात पराभवाचे तोंड बघावे लागले. जि. प.च्या सातपैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार निवडून आल्या. भाजपाचा जि.प.त पूर्ण सफाया झाला. राष्ट्रवादीला पंचायत समितीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपाने तीन जागा जिंकून आपली अब्रू वाचवली. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.राष्ट्रवादीचा विजय संघटन कौशल्यामुळे : कामठेजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे नेते अजित पवार यांनी घातलेले लक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने उमेदवार निश्चित करण्यापासून, प्रचाराचे नियोजन व गाव पातळीपर्यंत असलेले राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य यामुळेच खऱ्या अर्थांने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आता पक्षाचे तब्बल ४४ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँगे्रसवर विश्वास टाकला असून, जास्तीत जास्त विकास कामांच्या माध्यमातून या विश्वासाची परफेड करू असे जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले.भाजपाचा पूर्ण सफाया शेतमालाला नसलेला भाव, नोटाबंदी यांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष ओळखून तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपाविरोधी वातावरण तयार करण्यात यश मिळविले. शेतकऱ्यांनी अखेर मतदानातून भाजपाविषयीचा राग व्यक्त केला. परिणामी जि.प.मध्ये भाजपाचा या मतदारांनी पूर्ण सफाया केला.भाजप कार्यालयात शुभेच्छांचा वर्षावपुणे : ‘दादा जिंकलो...’, ‘छान काम केलंस!’, ‘तिथे आपला विजय निश्चित होताच रे!’, ‘दोन ठिकाणी पराभव झाला, हरकत नाही’ असे संवाद सातत्याने कानावर पडत होते...विजयी आणि पराभुतांची चर्चा, कार्यकर्त्यांचे कौतुक...‘कार्ड छपवाले, सुट सिलवाले, समझो हो ही गया’ अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून जाणवत होती. वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादासाठी विजयी उमेदवार सरसावले होते...पेढ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत होता. सनईच्या मंजूळ सुरांनी भारलेले वातावरण...केळीच्या पानांचे खुंट आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी केलेली सजावट...कार्यकर्त्यांचा जल्लोष...सेल्फीची ‘क्लिक क्लिक’ असा अनोखा उत्साह पुण्याच्या भाजप कार्यालयात पहायला मिळाला आणि ख-या अर्थाने पक्षाचा ‘सन्मान’ झाल्याची प्रचिती आली. विजय मिळवल्यानंतर कार्यालयात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. ‘पुणेकरांचा कौल विनम्रपणे स्वीकारतो! सर्वांचे मनापासून आभार’, ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं’ अशा फ्लेक्सच्या माध्यमातून भाजपने मतदारांचे आभार मानले.