शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

जेटीवरून राजकारण पेटले

By admin | Published: January 06, 2015 1:17 AM

राजन तेलींना नमविण्याचा प्रयत्न : आरोंदा येथे तणावग्रस्त परिस्थिती

सावंतवाडी/आरोंदा : आरोंदा बंदर जेटीवरून सुरू झालेल्या राजकारणाची परिणती सोमवारी दगडफेकीत झाली. यामुळे आरोंद्यातील वातावरण तंग बनले आहे. नारायण राणेंच्या गोटातून भाजपात प्रवेश केल्याने आरोंदा जेटीला विरोध करत राजन तेलींना नामोहरम करण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. कॉँग्रेसन नेते नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीतील जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, माजी सभापती प्रकाश कवठणकर, जिल्हा परिषद सदस्य पुनाजी राऊळ, सभापती प्रमोद सावंत आदी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरोंदा बंदर परिसरात दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'राजन तेली चोर आहे, त्याला गावातून हद्दपार करा', अशा घोषणा देत ग्रामस्थांनी स्थायी समितीबरोबर बंदराकडे मार्गक्रमण केले. बंदराच्या आत प्रवेश करताना कंपनीने घातलेल्या संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाशी झटापट करीत प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. यावेळी महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. बंदराच्या आतमध्ये घालण्यात आलेली संरक्षक भिंत ग्रामस्थांनी तोडून टाकली. त्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी जमावाची समजून करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्ही रस्ता अडविण्यास परवानगी कशी दिली, तुम्ही जर परवानगी दिली नसेल, तर आत्ताच्या आत्ता पोलिसात तक्रार द्या, अशी मागणी केली. बोर्डाचे अधिकारी प्रदीप आगाशे यांनी त्यास असमर्थता व्यक्त केली. आम्ही स्थायी समिती म्हणून आलो असताना हा आमचा अपमान आहे, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले पाहिजे होते, असे सांगत लिहून देत नाही, तोपर्यंत हलणार नसल्याचा इशारा दिला. स्थायी समितीच्या पाहणीवेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, विद्याधर नाईक, सुधाकर नाईक, प्रशांत नाईक, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे, मनोहर आरोंदेकर, दिलीप नाईक, गजानन तानावडे, बी. डी. पेडणेकर, शशी पेडणेकर, सरपंच आत्माराम आचरेकर, उपसरपंच वसंत चोडणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महेंद्र शेलार-सतीश सावंत यांच्यात खडाजंगीमेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याने रस्ता अडवून देण्याबाबत संभ्रम निर्माण केल्यानंतर सतीश सावंत आक्रमक झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना दबावाने अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊ नका, असे सांगितले. आम्ही दबावाने घेतो, हे तुम्ही सांगणारे कोण? असे विचारताच सतीश सावंत व महेंद्र शेलार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राजन तेली कंपनी कार्यालयात थांबूनव्हाईट आॅर्चिड कंपनीचे संचालक माजी आमदार राजन तेली हे सोमवारी दुपारपासूनच स्थायी समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी कार्यालयात बसून होते. त्यांच्यासोबत काका कुडाळकर, राजन आरोंदेकर, मनोज नाईक, उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.