शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:17 AM

मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. कोण नेमका कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

पत्रकार अमोल परचुरे यांनी राज यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले. ‘ठाकरे नेमके काय वाचतात?’ हा मुलाखतीचा विषय होता. ‘मी चेहरे वाचतो’ हे उत्तर देताच नाट्यगृहात चांगलाच हशा पिकला. महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी झटलेल्या लोकांचे योगदान समजून घेणे गरजेचे आहे, तसेच दादा कोंडके यांच्यावरचे ‘एकटा जीव’ हे पुस्तक आवडीचे असल्याचे राज  म्हणाले. 

वाचनाचे संस्कार करावे लागत नाहीत, ते होत असतात. यासाठी वाचनही आत्मसात करणे गरजेचे आहे. नियतकालिके बंद पडत आहेत. याकरिता मराठी वाचकांनी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या घडीला पुतळे केवळ जयंती आणि पुण्यतिथीला धुतले जातात. त्यामुळे केवळ स्मारक उभारून होणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकारणाबाबत  गुढीपाडव्याला सभेमध्ये बोलणार असे म्हणाले.

आमचं काय जळतं ते तुम्हाला कळेल...काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अशा दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कधीही मनसे या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगू शकतात, असे ‘मिम्स’ व्हायरल झाले होते. यावरही राज ठाकरेंनी रोखठोक मत मांडले. मला आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे की, तुम्ही पक्षाची जबाबदारी घेता का? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं, ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवसरात्र बरनॉल लावत असतो.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे