मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महापालिकांच्या; तसेच वसई-विरार महापालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी असून त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे केली.सांगली महापालिकेची मुदत१३ आॅगस्ट रोजी संपत असूनतेथे मतदारांची संख्या सुमारे ४लाख २३ हजार ३६६ आहे. एकूण२० प्रभागांतील ७८ जागांसाठीमतदान होणार आहे. जळगाव महापालिकेची मुदत १९ सप्टेंबररोजी संपत असून तेथील मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार१५ आहे. एकूण १९ प्रभागातील७५ जागांसाठी मतदान होणारआहे, अशी माहिती त्यांनीदिली.तसेच वसई-विरार शहर महापालिकेतील प्रभाग क्र. ९७च्या रिक्त पदासाठीही १ आॅगस्ट रोजीच मतदान होणार आहे.
सांगली, जळगाव महापालिकांसाठी १ आॅगस्टला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:57 AM