आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातच महाराष्ट्रातील निवडणुकांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्राच्या 4 पैकी पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील पहिला टप्पा : - 11 एप्रिल 2019
1 वर्धा लोकसभा मतदारसंघ2 रामटेक लोकसभा मतदारसंघ3 नागपूर लोकसभा मतदारसंघ4 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ5 गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ6 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ7 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकांच्या जाहीर तारखांनुसार राज्यातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला राज्यातील 10 मतदार संघात मतदान होईल. राज्यातील 14 मतदार संघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर उर्वरीत 17 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.