दापोली : प्रदूषणकारी रासायनिक खतांवर लवकरच बंदी घालण्यात येणार असून प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर हा एक धाडसी निर्णय असेल, असे सूतोवाच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत उंबरशेत येथील तळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरणाचे भूमिपूजन कदम यांच्या हस्ते झाले.ते म्हणाले की, रासायनिक खते ही विषासमान आहेत. खतांच्या अतिमात्रेने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडतात. माणसाचे आयुष्यही १५ ते २० वर्षांनी कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा विचार करून रासायनिक खतांचा वापर बंद करण्याबाबत विचार सुरू आहे.राज्यात २२७ नगरपालिका आणि २७ महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. तसेच गायी, म्हशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकºयांकडून शेण विकत घेऊन त्या माध्यमातूनही सेंद्रिय खत तयार करण्यात येईल. हे खत शेतकºयांना ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.कोकणावर सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अन्याय केला. पश्चिम महाराष्ट्रात १९ टक्के सिंचन क्षमता असून कोकणामध्ये ती केवळ एक टक्का आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील सिंचनासाठी एक हजार कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्यावेळी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला, असे ते म्हणाले.जमिनीचे आरोग्य महत्त्वाचेजमिनीची सुपिकता कायम राखण्यासाठी रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांचा अति वापर टाळण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून पारंपरिक भारतीय पद्धतीने शेती करण्याची गरज कृषितज्ज्ञ सातत्याने व्यक्त करत आहेत.
राज्यात प्रदूषणकारी रासायनिक खतांवर लवकरच येणार बंदी- रामदास कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:26 AM