जमीर काझी - मुंबई
मुंबई : अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक:यांच्या शोधासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’ केल्याच्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत अधिका:याची नियुक्ती केली जाईल. तथापि, तो महाराष्ट्र पोलीस सेवेबाहेरील असावा का, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
याप्रकरणी झालेले आरोप गंभीर असून त्याबाबत पुण्याच्या आयुक्तांकडून मंगळवीर आपल्याकडे पत्र प्राप्त झाले आहे. याविषयी उच्चस्तरीय अधिका:यांकडून तपासणी केली जाणार आहे. तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीसातील असावा की बाहेरील याबाबत चर्चा सुरू असून सर्व बाबींची विचार करून अधिका:याची नियुक्ती केली जाईल, असे दयाळ म्हणाले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 11 महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप त्याचा छडा लागलेला नाही. याच पाश्र्वभूमीवर ‘प्लँचेट’ केल्याची कबुली पोळ यांनी पत्रकार आशीष खेतान यांच्याकडे दिल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’ बुधवारी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे चौकशीचे पाऊल उचलले आहे.
पोळ यांचे सत्ताधारी नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ‘प्लँचेट’च्या तटस्थ चौकशीसाठी बाहेरील अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी पुण्याचे आयुक्त सतीश माथूर यांनी महासंचालकांकडे केली असल्याचे सांगण्यात आले.
प्लॅचेंट प्रकरणी संभाषणाची चित्रफित बिनबुडाची व खोटी आहे, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे तपासातून स्पष्ट होईल, असा दावा पोळ यांचे वकील प्रकाश मोरे यांनी केला.