हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या संवेदनशील घडनेबाबत पूजाचे वडील यांनी आमची मुलगी असे कृत्य करणार नाही. तिच्यावर पूर्ण विश्वास होता असल्याची सांगून पूजाचे आत्महत्येचे राजकारण करणं थांबवा असे आवाहन केले आहे.
लहू चव्हाण पुढे म्हणाले की, खूप चांगली मुलगी होती, उगाच बदनाम करत आहेत. असं काही नाही, लोक म्हणतात राजकीय दबावातून तुम्ही बोलत नाही. ज्यावेळी आम्ही पुण्याला गेलो; त्यावेळी आम्ही चौकशी केली. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाकडे विचारणा केली. तेव्हा चक्कर येऊन पूजा खाली पडली असं सांगितले. त्यावेळी मी खाली होतो, असं त्या मुलाने सांगितले त्यामुळे मी कोणावर आरोप करू, तिच्या कर्जाचा बोजा होता. उगाच मला बदनाम केले तर मीच आत्महत्या करेन, तेव्हा पूजाच्या आत्महत्येचे राजकारण करू नका, असे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी कैफियत मांडली आहे.
ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले
२५ ते ३० लाखाचे कर्ज तिच्यावर होते. वडिलांचे चांगले व्हावे म्हणून तिने बँकेतून कर्ज काढले होते. बांधकाम केले आणि पोल्ट्री व्यवसाय सुरु करतानाच कोरोना आला. त्यामुळे कोंबड्या आम्ही फुकट वाटल्या. १ रुपया न मिळता २५ लाख नुकसान झाले; सरकारने काहीच मदत केली नाही. मित्राकडून उसने पैसे घेऊन संसार सुरु आहे. सहा मुली आहेत. त्यामुळे कसाबसा घरप्रपंच चालू होता. त्यात बर्ड फ्लू आला. त्यानंतर पूजा म्हणाली माझं मन लागत नाही, मी पुण्याला जाते. मी पूजाला २५ हजार दिले आणि ती पुण्याला गेली. ८ ते दहा दिवस मी फोन करत होते, पैसे हवे का विचारले. ती नको म्हणाली. त्यानंतर पूजाच्या मित्राचा मला रात्री २ वाजता कॉल आला की, पूजा बाल्कनीतून पडली. डोक्याला मार लागला आहे. तुम्ही ताबडतोब या. मी गेलो, त्यावेळी ती मयत झालेली होती. आमची बदनामी सुरु असून ती थांबवा अन्यथा मीच आत्महत्या करेन असे पूजाचे वडील म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. पूजाने तिच्या मृत्युच्या पूर्वी मद्यपान केलेले होते. तसेच ती कठड्यावर बसलेली होती. त्यामुळे ती पडली का तिला पाडलं की तिने खरंच आत्महत्या केली आहे, याची चौकशी आता पोलिस करत आहेत. या प्रकरणी आता तिच्या कुटुंबीयांनी मौन सोडले असून राजकीय वळण देणं थांबवण्याची विनंती केली आहे.