शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 3:42 PM

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत.

Pooja Khedkar Latest News : महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चर्चेत आल्या आहेत. दररोज पूजा यांच्याबद्दल नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी चक्क एका डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याची माहिती आज समोर आली आहे. दरम्यान, आता पूजा यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. नियुक्तीदरम्यान त्यांनी फक्त ओबीसी किंवा अपंगत्व प्रमाणपत्रच नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देखील सादर केले आहे. तपासादरम्यान एकही कागदपत्र बनावट आढळून आल्यास त्यांना तत्काळ नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रांची पडताळणी न करता त्यांची नियुक्ती कशी झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. यासोबतच पूजाला व्हेरिफिकेशनसाठी अनेकवेळा बोलावूनही ती हजर झाली नाही, याचीही चौकशी होणार आहे.

पूजा खेडकर आरोपांवर काय म्हणाल्या?आपल्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर पूजा खेडकर यांनी चौकशीसाठी समिती स्थापन केल्यास, समितीसमोर माझी बाजू मांडेन, असे म्हटले आहे. 

चोराला सोडविण्यासाठी डीसीपींना फोनमुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठविला आहे, ज्यात पूजा यांनी एका चोराला सोडवण्यासाठी चक्क डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला फोन केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण 15 मे रोजीचेच आहे. पनवेल पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते. तेव्हा पूजा यांनी कथितरित्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करुन इश्वर उत्तरवाडे याला सोडण्यास सांगितले. 

पूजा यांनी फोनवर पानसरेंना आपली ओळख सांगितली, परंतू पानसरेंना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे पोलिसांनी या कॉलवर कोणतीही कारवाई केली नव्हती. उत्तरवाडे आजही न्यायालयीन कोठडीत आहे. पूजा यांचे कारनामे उघड होऊ लागल्यावर पानसरे यांना या फोन कॉलची आठवण झाली आणि त्यांनी लगेचच पुण्याचे जिल्हाधिकारी आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती दिली.

कोण आहे पूजा खेडकर?IAS पूजा खेडकर नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. युपीएससी पास केल्यानंतर सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली झाली. पूजा यांनी पुण्यात स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. याशिवाय, त्यांनी आपल्या खासगी ऑडी वाहनावर महाराष्ट्र सरकार लिहून, त्यावर अंबर दीवाही लावला होता. यावरुन वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार