बारामती : पूनम महाजन, तुमच्या वडिलांना चुलत्याने का मारले? हे महाभारत कसं घडलं? कशामुळे घडलं, याची विचारणा केली. तसेच तुम्हाला बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं,असा घणाघणाती टीका करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार पूनम महाजन यांना खडेबोल सुनावले. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. पवार म्हणाले, ह्यआपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती याची जाण ठेवा. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रमोद महाजन यांचे संबंध कसे होते. या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्या. जर आम्ही म्हटलं की, तुमच्या वडिलांना चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे, असा सवाल करीत अजित पवार यांनी महाजन यांना खडेबोल सुनावले. आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ———...लोकांना फसवण्याचा प्रयत्न ज्यांना खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ असे म्हणणारे आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले पाहिजे, असे म्हणत आहेत. मतांवर डोळा ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न हे शिवसेनावाले करीत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करणारे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रिकरणाची भाषा करीत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी शिवसेनेवर केली.
पूनम महाजन, तुमच्या घरात ‘महाभारत’कसं घडलं.. ? अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:20 PM
अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार यांची शिवसेनेवर टीका