नंदकिशोर नारे
वाशिम, दि. १२ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जिल्हा परिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या शौचालय बांधकाम मोहीमेमुळे ग्रामस्थांच्या मतांमध्ये परिवर्तन होत असल्याचे जिल्हयात चित्र आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे वाशिम तालुक्यातील जांभरुण परांडे येथील चंद्रमोळी झोपडीतील नारायण मयपती चव्हाण होय.
जांभरुण परांडे येथील चव्हाण यांचे घर कुळाचे आहे, थोडे जरी पाणी आले तर घरात पाण्याच्या धारा लागतात. शौचालय बांधण्याची परिस्थिती नाही अशा परिस्थितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जिल्हा परिषदेचे पथक गावात गेले अन जनजागृती केली. याला प्रभावित होवून त्याने अल्पावधित आपल्या चंद्रमोळी झोपडीसमोरचं विटा, सिमेंटने बांधलेले पक्के शौचालय उभारले. या शेतक-याचे सर्वत्र कौतूक होत आहे.