शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

तब्बल 36 तासांनी कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेने सोडली लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 6:10 PM

डोंबिवली- सीएसएमटीवरून कसारा मार्गावर संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी लोकल सोडण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी लोकमतला दिली.

डोंबिवली, दि. 30 -डोंबिवली- सीएसएमटीवरून कसारा मार्गावर संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी लोकल सोडण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी लोकमतला दिली. तब्बल 36 तासांनी पहिली लोकल अपघाताच्या मार्गावर मध्य रेल्वेने सोडली आहे, ती लोकल वासिंद आसनगाव मार्गावरून जाताना 10 ते 30 के एमपीएच स्पीडने धावेल, जर तो पर्यंत ओव्हर हेड वायरचे काम झाले नसेल तर ते पूर्ण करून लोकल कस-यासाठी पुढे नेणार असल्याचा विश्वास सिपीआरओउदासी यांनी व्यक्त केला.

वासिंद-आसनगाव घटनास्थळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्यासह 50 वरिष्ठ अधिकारी आणि विविध तांत्रिक विभागातील 350 अधिकारी कर्मचारी 36 तासांहून अधिक वेळ कार्यरत आहेत. ओव्हरहेड वायरचे काम बाकी असून ते अंतिम टप्यात आहे, रुळाचे काम झाले आहे.

नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ मंगळवारी रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले.

मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे निघालेली दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव रेल्वेस्थानकापुढे आली असता अचानक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने सर्व मातीचा ढिगारा व दगड रेल्वे ट्रॅकवर आला होता. तेवढ्यात दुरोंतो एक्स्प्रेस आली. समोर दरडी पडल्याचे लक्षात येताच दुरांतोचालकाने प्रसंगावधान साधून अचानक ब्रेक दाबला व गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता इंजिन रुळावरून घसरून विजेच्या खांबावर धडकले व पलटले.

त्या पाठोपाठ गाडीचे बी-१, बी-२, बी-३, बी-४, बी-५, बी-६ हे डबेही घसरून पलटी झाले. अपघात इतका भयानक होता की, रेल्वेचे विजेचे पोल, ओव्हरहेड तारा रेल्वे ट्रॅकवर आडव्या झाल्या होत्या. एकीकडे पाऊस व दुसरीकडे दरडींचा ढिगाराा यामुळे मदतकार्यास विलंब होत होता. अपघात झाल्यानंतर रेल्वेची आसनगाव ते वासिंददरम्यानचा वीज पुरवठा बंद करून डब्यांमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.दरम्यान अपघातस्थळ जंगलात असल्यामुळे आपत्कालीन यंत्रणा पोहोचण्यास उशीर झाला. रेल्वे प्रशासनाने तसेच शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कार यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत घटनास्थळी आढावा घेतला.

दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नागपूरहून मुंबईला उपचारासाठी निघालेले ६ रुग्ण होते. त्यात फ्रॅक्चरचे २ रुग्ण तर डायलेसीससाठी मुंबईकडे निघालेले ३ रुग्ण तर एक हार्ट पेशंट होते. या रुग्णांना शहापूर येथील आपत्ती व्यवस्थापन ग्रुपच्या सदस्यांनी खासगी रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविले. या रुग्णांपैकी नंदकिशोर मधुकर जिसकर (रा. अमरावती, भरतवाडी) यांना जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले तर गंगूबाई जोरदेवर (६०) रा. चंद्रपूर यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य ४ प्रवाशांना कल्याण येथे पाठविण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.

दुरुस्तीसाठी आलेल्या रेल्वे कर्मचा-यांना रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायरचे काम करताना अचानकपणे शॉक लागला. त्यात रामा राघो मेंगाळ, यशवंत भगत, मंगळू वारघडे, रामा वाघ, सखाराम मांगे, शिवराम ठाकरे हे जखमी झाले. या दरम्यान प्रवाशांचे हाल झाले. डोक्यावर बॅगा घेऊन जो-तो सुमारे २ किमी. पायपीट करीत महामार्ग गाठत होते. तेथून मिळेल त्या वाहनाने प्रवाशांनी कल्याण, ठाणे गाठले. अपघाताची माहिती मिळताच खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे