शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

मधुमेहासाठीही आता विमा मिळण्याची शक्यता

By admin | Published: July 28, 2016 1:11 AM

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (इरडा) आरोग्य विमाविषयक नव्या नियमांमुळे विमा कंपन्या आता मधुमेहासारख्या आजारासाठीही मर्यादित

मुंबई : इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (इरडा) आरोग्य विमाविषयक नव्या नियमांमुळे विमा कंपन्या आता मधुमेहासारख्या आजारासाठीही मर्यादित काळापर्यंत विमा संरक्षण देऊ शकतील, तसेच दीर्घकालीन अपघाती विम्याच्याही नव्या योजना बाजारात येऊ शकणार आहेत.सध्याच्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने आरोग्य विमा घेतल्यास ग्राहक पैसे भरेल तितकी वर्षे कंपनीला त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. कंपनी नूतनीकरण नाकारू शकत नाही. यात नाविण्याला काहीच वाव नाही. नाविण्य आणि ग्राहकांचे संरक्षण याचा सुवर्णमध्य गाठणारे नियम करण्याचा प्रयत्न इरडा आता करीत आहे. त्यानुसार पाच वर्षांच्या मुदतीच्या योजना सादर करण्याची मुभा नव्या नियमांत कंपन्यांना आहे. याचाच अर्थ कंपन्या आता प्रयोग करू शकतील. उदा. एखाद्या कंपनीला मधुमेहासारख्या आजारासाठी पॉलिसी द्यायची असेल, तर कंपनी पाच वर्षांसाठी अशी पॉलिसी देऊ शकेल. पॉलिसीचे फायदे- तोटे तपासून पाच वर्षांनी ही पॉलिसी ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय कंपनी घेऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला त्याच्या पर्सनल लोनच्या काल मर्यादेसाठी अपघाती विमा देता येऊ शकेल. याशिवाय ग्राहकांना एकाच कंपनीच्या योजना बदलून घेता येऊ शकतील. सध्याच्या नियमात योजना बदलून घ्यायची असल्यास ‘नो-क्लेम बेनिफिट’ या तत्त्वावरच ती घ्यावी लागते. लाभासह योजना बदलून घेणे शक्य असणार आहे.