लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेत एकवाक्यता नाही़ निर्णय प्रक्रियेत सहभागी असणारी शिवसेना नंतर निर्णयाला विरोध करते़ केवळ एकमेकांचा राजकीय आवाका आजमविण्यासाठी मध्यावधी निवडणुकांचा इशारा दिला जात असल्याचे सांगून १५ वर्षांनंतर सत्तेत आलेले मध्यावधी निवडणुका लागू देतील असे वाटत नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले़पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पवार म्हणाले, शेतकरी संपाची तीव्रता पाहून तत्त्वत: कर्जमाफी जाहीर केली़ मात्र, त्यात किचकट नियमांचा जीआर काढला़ या निकषांना आमचा विरोध असून, गरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी निकष बदलण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत़ शासनाचे निकष पाहता शेतकरी आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला की काय, अशी शंका उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी म्हणाले़
‘मध्यावधी निवडणुकांची शक्यता धूसर’
By admin | Published: June 19, 2017 1:43 AM