शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कोकणात पावसाची शक्यता : विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:02 PM

कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

पुणे : कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़.  चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता पुन्हा कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे़. मंगळवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून ८ मे रोजी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. ९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. १० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . 

  • ८ मे रोजी पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे़ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ व ९ मे रोजी पावसाची शक्यता आहे़. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ९ व १० मे रोजी पावसाची शक्यता आहे़. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात १० मे रोजी पावसाची शक्यता आहे़ .

 

टॅग्स :TemperatureतापमानVidarbhaविदर्भRainपाऊस