ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21- पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात येत असल्याने मुठा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण साखळीमधील खडकवासला धरण शुक्रवारी सकाळी 83 टक्के भरले. दहा दिवसांपूर्वी या धरणातील. 50 टीएमसी असलेला पाणी साठा 1.62 टीएमसी झाला आहे. तर पानशेत धरणही 75 टक्के भरले आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाचा पाणीसाठयाने मागील वर्षीच्या पाणीसाठा ओलांडला आहे. 21 जुलै रोजी मागील वर्षी या धरणामध्ये 15.77 टीएमसी पाणीसाठा होता या वर्षी तो गतवर्षी पेक्षा सव्वा टीएमसीने वाढला आहे. तर या धरण साखळीमधील सर्वात मोठे वरसगाव धरणंही 50 टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.