शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राज्यात 2 ते 4 जून सर्वदूर पावसाची शक्यता

By admin | Published: May 27, 2017 2:30 PM

मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केल्याने तो वेगाने पुढे सरकणार असून येत्या २, ३, ४ जून दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 -  मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केल्याने तो वेगाने पुढे सरकणार असून येत्या २, ३, ४ जून दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
 
डॉ. साबळे हे कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख असून गेल्या १५ वर्षांपासून ते शेतीच्या दृष्टीने मान्सूनचा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी मॉडेल तयार केले असून हा अंदाज मार्च, एप्रिल व मे महिन्यातील कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वा-याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. त्यासाठी त्यांना डॉ. खासेराव गलांडे आणि अभियंता विलास नजन हे सहाय्य करीत आहेत.
 
डॉ. साबळे यांनी सांगितले की, दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्याचे वितरणही वेगळे असते. त्यादृष्टीने राज्यात विभागवार नेमका किती पाऊस पडेल व खंड कधी असेल, याची माहिती शेतक-यांना मिळणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने तो पिकाचे नियोजन करु शकतो. स्थानिक पातळीवर अंदाज व्यक्त करायचा असेल तर किमान ३० वर्षांचा डाटा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी सरासरी ऐवढा पाऊस पडेल असे म्हटले जाते, तेव्हा तेथे फरक पडू शकतो़ मध्ये खंड पडू शकतो व पुढच्या काळात कमी दिवसांत अधिक पाऊस पडून तो सरासरीएवढा येऊ शकतो. 
 
राज्यात २, ३ व ४ जून दरम्यान सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी या काळात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल. तेथे पेरणी लवकर करण्यास हरकत नाही. पेरणी लवकर झाल्यास यंदा उत्पादन जास्त होईल. या वर्षी मान्सून कालावधीत एलनिनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वा-याचा वेग कमी आढळल्याने २० जून ते १० जूलैच्या दरम्यान पावसात खंड पडतील. विदर्भ व मराठवाड्यात पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदविले गेल्याने मान्सूनचे आगमान वेळेपूर्वी होणे शक्य आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
महत्त्वाचे मुद्दे
* जुलैच्या पहिल्या आठवड्यात खंड पडण्याची शक्यता
* यवतमाळला अतिवृष्टी होण्याची शक्यता
* राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरात अतिवृष्टी तर काश्मीर, उत्तर प्रदेश या पट्ट्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
* पुढील वर्षापासून औरंगाबाद, नांदेडचे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न
 
 
डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलेला पावसाचा अंदाज (मिमी)
जून ते सप्टेंबर २०१७
विभाग         सरासरीअंदाजटक्केवारी
अकोला          ६८३.७६८३.७१००
नागपूर          ९५८९५८        १००
यवतमाळ          ८८२९२६        १०५
शिंदेवाही        ११९११२४०१०४
(चंद्रपूर)
परभणी         ८१५         ८१५        १००
दापोली         ३३३९३५०७१०५
निफाड          ४३२४५७        १०६
जळगाव           ६३९६५०        १०१
पाडेगाव           ३६०३६८        १०२
सोलापूर           ५४३५४३        १००
राहुरी                   ४०६४०६        १००
पुणे                   ५६६५९४         १०५