शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पोस्टाला झाली ६८० कोटींची कमाई

By admin | Published: October 10, 2015 5:44 AM

माहिती तंत्रज्ञान युगात ई-कम्युनिकेशन वाढल्याने गतकाळातील पत्रोपत्रीच्या व्यवहारांवर मर्यादा आली असली तरी दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने पोस्ट खात्याला सावरलेदेखील आहे.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईमाहिती तंत्रज्ञान युगात ई-कम्युनिकेशन वाढल्याने गतकाळातील पत्रोपत्रीच्या व्यवहारांवर मर्यादा आली असली तरी दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने पोस्ट खात्याला सावरलेदेखील आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स संस्था आणि इतर माध्यमातून पोस्टाला तब्बल ६८० कोटींची कमाई झाली आहे. राज्य परिवहन खात्याने लायसन आणि आरसी बूक पोस्टानेच पाठवण्याचा निर्णय घेतल्याने पोस्ट आॅफिसला तब्बल २३ कोटींचा गल्ला मिळाला आहे. पोस्टकार्ड आणि व्यक्तिगत टपाल एकेकाळी रोज ४० ते ४५ लाखांच्या घरात येत असे. मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या युगात हे प्रमाण एकदम कमी झाले; आणि व्यक्तिगत टपालांची संख्या दररोज २३ लाख एवढी कमी झाली. पोस्ट आॅफिसेस बंद पडतात की काय असे वाटत असताना पोस्टाने कात टाकली. राज्यात १२,८६० पोस्ट आॅफिसेस आहेत, त्यापैकी फक्त २२०० पोस्ट आॅफिसेस शहरी भागांत तर उर्वरित ग्रामीण भागांत आहेत. आजपासून जागतिक टपाल सप्ताह सुरू झाला. आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यातील ५५० पोस्ट आॅफिसेस हायटेक केली जाणार असून, पोस्टमनना इलेक्ट्रॉनिक हॅण्डल डिव्हाईस दिले जाणार आहे. ग्रामीण भागात विजेची टंचाई असते म्हणून या सगळ्या पोस्ट आॅफिसेसना सोलार पॅनल दिले जाणार आहेत. पोस्टात लॅपटॉपसारख्या गोष्टी येणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी होताच येत्या ५ वर्षात महाराष्ट्रातील १० हजार पोस्ट आॅफीसेस हायटेक केली जातील. पोस्टाचे सहाय्यक पोस्टमास्तर जनरल एस.बी. व्यवहारे म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचे राज्यात ३५ लाख खातेधारक असून यावर्षी आम्ही २८२७ कोटींचे वाटप त्याद्वारे केले आहे. त्याशिवाय राज्यातील पोस्टात ३ कोटी १५ लाख खातेधारक असून त्यांची ७०७ कोटींची गुंतवणूक आमच्याकडे सुरक्षित आहे. नुकत्याच सुरु झालेल्या सुकन्या समृध्दीची योजनेचे आत्ताच ४ लाख ८४ हजार खातेधारक झाले असून त्यांनी २०५ कोटींची गुंतवणूक पोस्टात केली आहे. यावर्षी २० लाख खाते उघडण्याचा संकल्प पोस्टाने सोडलेला आहे.‘कुठेही पैसे भरा, आणि कोठूनही काढा’ या योजनेअंतर्गत कोअर बँकींग सोल्यूशन पध्दती पोस्टाने ६२२ पोस्ट आॅफीसमध्ये सुरु केली. येत्या ३१ आॅक्टोबर अखेरीस ३२२ पोस्ट आॅफीसांची त्यात भर पडणार आहे. आज पोस्टातर्फे दररोज हाताळल्या जाणाऱ्या टपालामध्ये कार्पोरेट सेक्टरचे १० लाख, स्पीडपोस्टचे ४.५ लाख, रजीस्टर्डच्या २ लाख टपालांचा समावेश आहे. रेल्वे रिर्झवेशनची सोय पोस्टाने राज्यातल्या फक्त ३७ पोस्टात करुन दिली होती तर त्यातून पोस्टाला १.२५ कोटी रुपये मिळाले. बिझनेस देणारे...आरटीओ२३ कोटीबडोदा बँक१० कोटीअ‍ॅक्सिस बँक ७.७५ कोटीएमएसईबी७.५ कोटीई कॉमर्स६.९ कोटीएसबीआय५ कोटी