ठाणे : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतनधारकाना प्राप्त होणाऱ्या रकमेची माहिती (प्रदानाबाबत) देणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी क्र मांक (मोबाईल नंबर) कोषागार कार्यालयात नोंदवण्याचे आवाहन केले आहे.जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे येथून निवत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या संगणक प्रणालीत सर्व नोंदी अद्ययावत केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्डच्या छायांकीत प्रती देण्यासह त्यांचे मोबाईल क्रमांकही नोंदवण्याचे सूचित केले आहे. शासकीय निवत्ती वेतनधारकांपैकी ज्यांनी पुनर्नियुक्ती स्वीकारली आहे व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांस अनुकंपा नियुक्ती अथवा शासकीय तथा निमशासकीय विभागात नवीन नियुक्ती झाली असेल, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी पुनर्विवाह केला असेल आदी संपूर्ण माहितीदेखील कोषागारास कळवणे आवश्यक आहे. याशिवाय वयाची ८० वर्षे पूर्ण झाली असतील पंरतु, अतिरिक्त १० टक्के निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नसेल तर त्यांनी वयाचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे यांनी दिलेला दाखला यापैकी एक दस्ताऐवज कोषागार कार्यालय, ठाणे येथे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना मिळणारे लाभ त्यांच्या निवत्तीवेतनात अदा करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी नि. सा. पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निवृत्ती वेतनधारकांनी मोबाईल नंबर देणे गरजेचे
By admin | Published: December 12, 2015 12:54 AM