अकोला : ह्यपावटाह्ण लायबीन या भाजीपाला पिकावर संशोधन करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवे वाण विकसित केले आहे. या वाणाला येत्या १२ मे रोजी दापोली येथे होणार्या राज्य स्तरीय संशोधन परिषदेत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. डॉ. पंदेकृविने १३ विविध पिकांचे नवीन वाण विकसित केले आहेत. यात उद्यान विद्या विभागाच्या ९ वाणांचा समावेश आहे. ह्यपावटाह्ण या भाजीपाला पिकावर संशोधन करू न प्रसारासाठी राज्य स्तरीय संशोधन समितीसमोर मांडणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पहिले ठरणार आहे. ह्यपावटाह्णमध्ये आरोग्यासाठी लागणारे भरपूर जीवनसत्वे (प्रोटीन) असून, या पिकाला प्रतिकिलो २५0 रुपये दर आहेत. या भाजीपाल्याच्या दाण्याची भाजी केली जाते. विदर्भात अलीकडे वाढलेली फुलशेती बघता, या कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणार्या ग्लॅडीओलस व शेवंती या फुलांच्या जातीवर संशोधन केले आहे. यासह ह्यचक्रधरह्ण या नावाने निंबू, हळद-जीडीटी-0६-0२, हिरवे वांगे, चोखा दोडका, वाल या फळ व भाजीपाला पिकांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. तसेच अधिक उत्पादन देणारी पॅडी-एसवाय-६३ ही भाताची जात विकसित केली आहे. हळद काढणी व ज्वारी कापणी यंत्र या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. वांगे, चोखा दोडका, वाल व पावटा या सर्व जाती अधिक उत्पादन देणार्या आहेत. या चारही वाणावर उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉ. विजय दोड यांनी संशोधन केले आहे. हळद पिकावर डॉ. विजय काळे यांनी संशोधन केले असून, नवीन निंबू जातीवर डॉ. प्रकाश नागरे यांनी संशोधन केले आहे. अधिक उत्पादन देणार्या ग्लॅडीओलस व शेवंती या फुलांच्या जाती डॉ. दलाल यांनी विकसित केल्या आहेत.
‘पावटा’ भाजीपाला पिकाचे नवे वाण विकसित!
By admin | Published: May 11, 2014 12:00 AM