शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

गणेशभक्तांच्या वाटेत खड्डे; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, चाकरमान्यांचा प्रवास खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 6:58 AM

दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या  खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो.

- अनिल पवार नागोठणे : गेले काही वर्षे दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा, महामार्गाचा वनवास काही केल्या संपत नाही. यामुळे कोकणवासीयांना या मार्गावरून प्रवास करताना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अपूर्ण अवस्थेत असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढते. 

दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या  खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. यावर्षीही महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर पळस्पे-इंदापूर या पहिल्या टप्प्यातील वडखळ ते इंदापूर या दरम्यान डोळवी, गडब, आमटेम, पळस, नागोठणे ते कोलाड दरम्यान तसेच कोलाड ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील आयोजित भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम एका वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती; मात्र अद्यापही कासू ते कोलाड दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट स्थितीत आहे. दरम्यान, हा महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुरवस्थेमुळे सतत कोंडी होत असते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग