शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

दोन्ही काँगे्रसच्या हातातच सत्ता ?

By admin | Published: February 22, 2017 1:06 AM

जिल्हा परिषदेचे रणांगण : शिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत; ‘स्वाभिमानी’च्या घसरणीचा अंदाज

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने चुरस पाहावयास मिळाली. मंगळवारी रात्री नऊपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली, हे पाहता एका-एका मतासाठी किती झटापट सुरू होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार, याचा फैसला उद्या, गुरुवारी होणार असला तरी जिल्ह्यात याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. मतदानानंतर ‘लोकमत’ने कौल कोणाच्या बाजूने जाईल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेसमध्ये फोडाफोडी करून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा भाजपने प्रयत्न केला असला तरी सत्तेच्या स्पर्धेत ते बरेच मागे राहण्याची शक्यता आहे. एकूण बलाबलात कॉँग्रेस पक्ष ‘नंबर वन’ राहू शकतो. दोन्ही कॉँग्रेस व काही स्थानिक आघाड्या एकत्रित येऊन सत्तेच्या चाव्या ताब्यात घेऊ शकतील, असाच अंंदाज मतदानानंतर व्यक्त होत आहे. नगरपालिका निवडणुकीतील रणनीती वापरत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दिग्गजांना पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण केले. कॉँग्रेसने जिल्हा परिषदेच्या ६७ पैकी ४६ जागा लढविल्या होत्या. भाजपने ३७, राष्ट्रवादी कॉँग्रेसने ३२, तर शिवसेनेने ४० जागांवर उमेदवार होते. प्रचारात सर्वच पक्षांनी राळ उडवून दिली. भाजपने ज्या पद्धतीने निवडणुकीदरम्यान हवा तयार केली, ती पाहता सत्तेच्या बेरजेत भाजप फार पुढे असेल, असेच वाटत होते; पण मतदानानंतर अंदाज घेतला असता भाजपला अपेक्षित यश मिळेल, असे चित्र दिसत नाही; पण भाजप दहा जागांवरच थांबण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस १८, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला ११ जागांवर यश मिळू शकते. शिवसेना मुसंडी मारत १४ जागा पदरात पाडून घेत सत्तेच्या गोळाबेरजेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याशिवाय ‘जनसुराज्य’ गतवेळचे संख्याबळ कायम ठेवील, असा अंदाज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र घसरण दिसत असून, त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरोळमध्येही नाकीदम येण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक आघाड्यांना सहा ते आठ ठिकाणी यश मिळू शकते. सत्तेची जोडणी अशीकाँग्रेसचे मावळत्या सभागृहात चिन्हांवर निवडून आलेले ३० सदस्य होते. त्या पक्षाने किमान २२ जागा मिळतील असा दावा केला आहे; परंतु मतदानानंतरचे चित्र पाहता काँग्रेस १९ पर्यंत जाऊ शकते. आवाडे गट राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता करायची झाल्यास काँग्रेसला दोनच जागा कमी पडतात. त्यांना आमदार प्रकाश आबिटकर यांची आघाडी मदत करू शकते. स्वाभिमानीही काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय आहे, परंतु त्यांना राष्ट्रवादी चालणार का? हा प्रश्न आहे. शिरोळमध्ये भाजपने स्वाभिमानीला बराच त्रास दिला असल्याने दगडापेक्षा वीट मऊ म्हणून स्वाभिमानी काँग्रेससोबत जाऊ शकते....तर भाजपला संधी...भाजप, जनसुराज्य व ताराराणीची मिळून जास्तीत जास्त सदस्यसंख्या १५ पर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत त्यांना शिवसेनेने मदत केल्यास महापालिकेप्रमाणेच ते देखील सत्तेच्या अगदी जवळ पोहोचू शकतात. मात्र, यातला महत्त्वाचा तिढा हाच आहे की शिवसेना त्यांच्या सोबत जाणार का..? माजी आमदार महादेवराव महाडिक व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काहीही करून सत्तेची मोट बांधण्याचा कसोशीने प्रयत्न करतील. मुंबई महापालिकेत काय राजकारण आकार घेते, यावर या घडामोडी अवलंबून असतील.कॉँग्रेसचा ‘मनपा’ पॅटर्न!इतर राजकीय पक्षांप्रमाणे भपकेबाजपणा व फारसे आरोप-प्रत्यारोप न करता कॉँग्रेसने प्रचार यंत्रणा राबविली. महापालिका निवडणुकीतही त्यांनी अशीच यंत्रणा राबविली होती. त्यामुळे कॉँग्रेसला ‘मनपा’सारखे अनपेक्षितपणे यश मिळण्याची शक्यता आहे. मतदान चांगल्या टक्केवारीने आणि शांततेत झाले. कोणतीही दडपशाही दिसून आली नाही. भाजप-मित्रपक्षांच्या मदतीने ३६ चा जादूई आकडा गाठून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावल्या शिवाय राहणार नाही. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीकॉँग्रेसची लाट यावी अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. गेल्या वेळेप्रमाणेच कॉँग्रेस जिल्हा परिषदेच्या सत्तेत येणार आहे. त्यासाठी समविचारी पक्षाची गरज भासल्यास सहकार्य घेतले जाईल. - पी. एन. पाटील, राष्ट्रीय कॉँग्रेसकोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेस २२ जागांच्या खाली येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकावू. - सतेज पाटील, आमदारयंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली होती. सेनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच सर्वाधिक जागा पटकावत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये शिवसेना ंिकंगमेकर ठरेल. - विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुखमहापालिकेप्रमाणेच याही निवडणुकीत भाजपचा फुगा फुटणार आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखविणार असून, यावेळी सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग असेल.- हसन मुश्रीफ, आमदार एक दावा असाही...भाजप आणि मित्रपक्षांकडून मात्र कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर ‘भाजता’ची सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या गणिताप्रमाणे भाजप- १५, जनसुराज्य- ८, ताराराणी आघाडी- ४, आमदार कुपेकर गट- १ आणि धैर्यशील माने गट- १ अशा एकूण २९ जागा निवडून येतील. अशा स्थितीत शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करते यावर सत्तेचा लंबक अवलंबून असेल. या आघाडीच्या मतानुसार कॉँग्रेसला १५ व राष्ट्रवादीला ८ जागा मिळतील. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेस मिळून २३ च्या पुढे जाऊ शकत नाहीत, असे ठामपणे सांगितले जात आहे.