नागपूर- राज्यात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक वीज निर्मीती केंद्रावर दोन ते तीन दिवस कोळसा पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. वीज निर्मीतीमध्ये महत्वाच्या असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा १७ ते १८ दिवस पुरेल इतकाच वीज निर्मितीचा पाणी साठा उपलब्ध आहे.
संपूर्ण देशामध्ये विजेचे संकट निर्माण झालेला आहे. कोरोना संपला आणि सगळे कामाला लागले, त्यामुळे विजेची मागणी मोठ्या वाढली, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. नितीन राऊत यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या तापमान वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सोबतच आता सणासुदीचा काळ असल्यामुळे देखील विजेची मागणी वाढलेली आहे. मागणी आणि पुरवठामध्ये फरक त्यामुळं बाहेरून वीज घ्यावी लागते. अनेक ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे. त्याठिकाणी रेल्वेच्या रॅक मिळत नाही आणि ज्या ठिकाणी रॅक आहेत, तिथे कोळसा उपलब्ध नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, गुढीपाडव्यापासून घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला असून वीजदर दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होत असून, अदानींच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत.