शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वीज वितरण हानी ३० टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर; महावितरणचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 2:24 AM

वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल आणि त्याचा फायदा वितरण क्षेत्रात ग्राहकांना होईल याकरिता महावितरण मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रांत वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत असून, २००६-०७ या वर्षांतील सुरुवातीची ३०.२ टक्के वितरण हानी २०१७-१८पर्यंत १३.९२ टक्क्यांवर आल्याचा दावा महावितरणने केला आहे.

मुंबई : वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल आणि त्याचा फायदा वितरण क्षेत्रात ग्राहकांना होईल याकरिता महावितरण मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रांत वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत असून, २००६-०७ या वर्षांतील सुरुवातीची ३०.२ टक्के वितरण हानी २०१७-१८पर्यंत १३.९२ टक्क्यांवर आल्याचा दावा महावितरणने केला आहे.मुंबईमधील भांडुपसह मुलुंड क्षेत्र आणि उर्वरित राज्यात महावितरण वीजपुरवठा करीत असून, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर महावितरणने सांगितले की, वीजदरवाढ १५ टक्के प्रस्तावित आहे. २०१९-२० वर्षाकरिता दरवाढ प्रस्तावित केलेली नाही. २०१५ सालापासून महावितरणकडे मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे.महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये घरगुती वर्गवारीसाठी वीजवापरानुसार तसेच वीजजोडभारानुसार बदलते स्थिर आकार लागू आहेत. मध्य प्रदेशात २० रुपये प्रत्येक ०.१ किलोवॅट भारासाठी म्हणजे ४०० रुपये प्रति महिना २ किलोवॅट भारासाठी, दिल्लीत २५० रुपये प्रति महिना २ किलोवॅट भारासाठी, छत्तीसगडमध्ये ३०० युनिट्ससाठी ८५८ रुपये प्रति महिना इतके स्थिर आकार लागू आहेत. या तुलनेत महावितरणने ३०० युनिट्सपर्यंतच्या वीजवापरावर १७० रुपये प्रतिमहिना स्थिर आकार प्रस्तावित केला आहे. जो तुलनेने कमी आहे. ३०० युनिट्सपर्यंत वीजवापर करत असलेल्या घरगुती ग्राहकांची संख्या ९५ टक्के आहे.विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रमधील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, विदर्भातील औद्योगिक वीजग्राहकांना वीज बिलात ७० ते १९२ पैसे प्रतियुनिट, मराठवाड्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना वीज बिलात ५५ ते १३० पैसे प्रतियुनिट, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक वीजग्राहकांना वीज बिलात ३० ते ६० पैसे प्रतियुनिट सवलत उपलब्ध आहे. पर्यायाने औद्योगिक ग्राहकांना इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त दराने वीज उपलब्ध आहे, असा दावा महावितरणने केला आहे. तर क्रॉस सबसिडीचा भार कमी करण्यासाठी कृषी वर्गवारीच्या दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.सवलतींचा फायदाउच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सवलती उपलब्ध आहेत. २०१६-१७ व २०१७-१८चा उच्चदाब औद्योगिक वर्गवारीचा सरासरी देयक दर अनुक्रमे ८.५७ रुपये प्रतियुनिटवरून ८.६१ रुपये प्रतियुनिट होता. सवलतींचा लाभ घेतल्याने हा दर अनुक्रमे ७.०३ व ७.२० आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण