शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोराडी ६६० मेगावॅट क्षमतेच्या संचातून वीजनिर्मिती

By admin | Published: December 23, 2015 2:06 AM

महानिर्मितीच्या कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८मधून वाणिज्यिक तत्त्वावर वीज उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादन क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडली आहे.

मुंबई : महानिर्मितीच्या कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८मधून वाणिज्यिक तत्त्वावर वीज उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादन क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडली आहे. परिणामी, महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १२ हजार ७७ मेगावॅट इतकी झाली असून, यामध्ये औष्णिक ८ हजार ६४० मेगावॅट, वायू ६७२ मेगावॅट, जलविद्युत २ हजार ५८५ मेगावॅट आणि सौरऊर्जा १८० मेगावॅटचा समावेश आहे.महानिर्मितीच्या मालकीच्या १७२ हेक्टर जमिनीवर एकूण १ हजार ९८० मेगावॅट क्षमतेचा हा विशाल वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाकरिता छत्तीसगड येथील गरेपालम-२ या खाणीतून प्रतिवर्षी ९.१ दशलक्ष मेट्रीक टन म्हणजे प्रतिदिन २५ हजार मेट्रीक टन कोळशाची तरतूद आहे. प्रकल्पाकरिता आवश्यक पाणीपुरवठ्याबाबत नागपूर महापालिका आणि महानिर्मितीमध्ये १३० दशलक्ष लीटरचा सामंजस्य करार झाला आहे. भांडेवाडी प्रकल्पातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीकरिता पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकाराचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे. वीजनिर्मितीसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर केल्याने शेतीसाठी अधिकचे पाणी उपलब्ध झाले आहे.नागपूरमधील कोराडी गावात १९७० साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना केली होती. विद्युत संचाचे जुने तंत्रज्ञान, वाढते वयोमान, विजेची मागणी लक्षात घेता १२० मेगावॅट क्षमतेचे ४ संच कालपरत्वे बंद करण्यात आले. महानिर्मितीने त्याऐवजी कोराडी येथे सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेचे तीन अत्याधुनिक संच उभारणीचे काम हाती घेतले. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ‘मेगा पॉवर प्रोजेक्ट’चा दर्जा बहाल केला आहे.