ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ३० : शहरासह परीसरात सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास सुरू असलेल्या मुसळधार पावसात अचानक शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर वीज कोसळली.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.मात्र वीज कोसळल्यामुळे बाजारपेठ पोलीस ठाणे क्षणात अंधारात बुडाले.वीज वायरलेस टॉवरवर पडल्याने ते निकामी झाले.
शिवाय पोलीस ठाण्यातील दोन संगणक,एक वायरलेस संगणक,वायफायन कनेक्शन सुविधा क्षणात निकामी झाली.सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक आसमंत दणाणून सोडणारा आवाज होऊन वीज कडाडली.ती कोठेतरी जवळपास पडली असावी असे वाटत असताना ती बाजारपेठ पोलीस ठाण्यावर कोसळली.मात्र पोलीस ठाण्याच्या आवारात वायरलेस टॉवर असल्यामुळे ती त्यावर पडली व मनुष्य टळली.
अनर्थ टळलावायरलेस टॉवर बाजुला असता तर मोठी प्राणहानी झाली असती.सुदैवाने काहीही झाले नाही,असे पोलीस सूत्रांनी सांगितले.दरम्यान, भुसावळ विभागातही जोरदार पाऊस झाला.