शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

राज्याच्या वीजपुरवठ्याची मदार खासगी क्षेत्रावर; ५५%पुरवठा खासगी क्षेत्राकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 1:15 AM

महानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.

मुंबई : भारनियमनाच्या चटक्यांमधून आठ वर्षांपूर्वीच मुक्ती मिळालेला महाराष्ट्र वीजपुरवठ्यात स्वयंपूर्ण असल्याचे दिसत असले तरी महानिर्मितीकडून होणाऱ्या वीजनिर्मितीत गेल्या तीन वर्षांत घट झाली आहे, तर खासगी क्षेत्राकडून होणाºया वीजपुरवठ्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खासगी क्षेत्राच्या विजेचा टक्का ५५ पेक्षाही जास्त झाला असून, महानिर्मितीची झेप ४१ टक्क्यांवरच थंडावली आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावरील महाराष्ट्राची मदार वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील विजेचा दरडोई वापर १०८३ युनिट असून देशात ते प्रमाण ७८४ युनिट आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील वीज वापराचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. विजेची मागणी २०१६-१७ साली १६८८ मेगावॅट होती. ती आता २० हजार ३८९ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.

महावितरण, बेस्टच्या वीज खरेदीचे प्रमाणही वाढू लागले आहे. या वीज खरेदीसाठी महावितरणने २०१७-१८ साली मासिक १९३ कोटी रुपये मोजले होते. यंदा ते प्रमाण २१२ कोटींवर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक वीज ही उद्योगांसाठी (३४,४४८ दशलक्ष युनिट) वापरली जाते. त्याखालोखाल घरगुती वीज वापर (२३,३५३), कृषी (२०,९३०) वाणिज्य (११,०१३), सार्वजनिकसेवा (३८४९), रेल्वे (१३९) यांचा क्रमांक लागतो.महानिर्मितीचे क्षमता वाढीचे प्रयत्नमहानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार भुसावळ येथे ६६० मेगावॅट आणि कोराडी येथे १३२० मेगावॅट वीजनिर्मितीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानेही तत्त्वत: मंजुरी दिली असून, हे काम येत्या काही महिन्यांत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.वितरण हानी घटलीगेल्या चार वर्षांतल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महावितरणची वीजपुरवठ्यातील वितरण हानी १४.६८ टक्क्यांवरून १२.१७ टक्के इतकी कमी झाली आहे. मात्र, बेस्ट (४.३४), रिलायन्स (८.३६) आणि टाटा पॉवर (०.८९)च्या तुलनेत ती खूप जास्त आहे. राज्यातील ८६ टक्के वितरण व्यवस्थेचा भार महावितरणच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही वितरणहानी जास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :electricityवीज