अमितभाई अनिलचंद्र शहा यांची सहा महिन्यांपूर्वी भाजपाचे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळी पक्षात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्याच. शिवाय बनावट चकमकप्रकरणात गुंतलेल्या व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी कशी टाकण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमके काय आहे, याचे आकलन पक्षजनांना होत नव्हते. पण शुक्रवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालांनी त्यांच्या या प्रश्न्राचे उत्तर मिळाले आहे. उत्तर प्रदेशात क्रांती घडविल्यानंतर अमित शहा आता राष्ट्रीय पातळीवर महत्वाची भूमिका वठविण्यास सज्ज झाले आहेत.
उत्तर प्रदेशसारख्या अवघड राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळवून देणारे हे अमित शहा नावाचे रसायन आहे तर काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता आज सर्वाच्याच मनात निर्माण झाली आहे.
मुळात बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी असलेले अमित शहा यांना स्टॉक मार्केटची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांनी कुटुंबाचा पीव्हीसी पाईप लाईनचा पारंपारिक व्यवसाय सांभाळण्यापूर्वी शेअर बाजारात भविष्य आजमावणो सुरु केले होते. एका प्रतिष्ठित व्यावसायी कुटुंबात 1964 साली जन्मलेले शाह बालवयातच संघाच्या शाखेत जायला लागले होते. त्यांचे कुटुंब अहमदाबादच्या ग्रामीण भागातील मनसा या गावातील.
ऐशीच्या दशकात ते मोदींच्या संपर्कात आले. मोदींनी 1986 साली भाजपात प्रवेश केला. 87 साली ते राज्याचे सरचिटणीस झाले. त्याचवेळी शहा यांच्यातील स्पार्क मोदींनी ओळखला होता. आणि त्यांच्याच विनंतीवरुन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी 1995 साली राज्य वित्त महामंडळाच्या अध्यक्षस्थानी शाह यांची नियुक्ती केली. या पदावर कार्यरत असता पक्षातही आपले स्थान बळकट करण्याचा प्रय} शहा यांनी सुरु केला होता. पण त्यांना खरा राजकीय ब्रेक मिळाला 2क्क्2 साली. मोदींनी विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर मंत्रिमंडळात आलेले शाह यांच्याकडे गृह, कायदा व न्याय, सीमा सुरक्षायासह एकूण दहा खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य आणि माणसं जोडण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे भाजपाला क्रीडा आणि सहकारी क्षेत्रत आपली पाळेमुळे रोवता आली. याच काळात निवडणुकांमधील त्यांचा व्यक्तिगत आलेखही उंचावत होता. हळूहळू मोदी-शहा यांची दोस्ती ‘जोडी नंबर वन ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
उत्तर प्रदेशची यशस्वी वारी
शहा यांच्यातील या संघटन कौशल्याचाच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अत्यंत चतुराईने वापर करुन घेतला. आणि अपेक्षेप्रमाणो शहा या कसोटीला खरे उतरले. शहा हे उत्तर प्रदेशात पक्षाचे पुनरुज्जीवन तर करतीलच आणि चांगले निकालही आणतील याची संपूर्ण खात्री मोदी यांना होती.
मोदी यांची उत्तर प्रदेशातील योजना ही संघटनस्तर आणि लोकसभेसाठी उमेदवारांची निवड या दोन गोष्टींवर आधारित होती. शहा यांनी सर्वप्रथम पक्षातील बनावट सदस्यांना बाजूला सारले. आणि जास्तीतजास्त संघ स्वयंसेवकांना आपल्या मोहिमेत सहभागी करुन घेतले. निवडुका जाहीर होताच प्रत्येक मतदारसंघाचे पालकत्व या संघ प्रचारकांकडे सोपविले.
कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नसलेले संघाचे प्रचारक पालक या नात्याने प्रत्येक मतदारसंघातील खरीखुरी माहिती आपल्याला देतील याची शहा यांना खात्री होती. मोदी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात उतरविण्याची कल्पना ही शहा यांचीच होती आणि त्यांनीच मोदींसाठी वाराणशीची निवड केली होती असे पक्षाच्या आतील गोटातील लोक सांगतात. पक्षस्तरावर होणा:या चुकीच्या गोष्टी रोखून चांगल्यातून यशाच्या दिशेने वाटचाल ही कार्यप्रणाली शाह यांना यशोशिखरावर घेऊन गेली. शहा यांची अत्यंत कठोर मेहनत आणि राजकीय डावपेचांची आखणी भाजपाच्या उत्तर
प्रदेशात उदयास कारणीभूत ठरली, हे मान्य करावेच लागेल.
वाद आणि शहा
अमित शहा यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय हा निवडणुकीतील यशासोबत वादांनीही घेरलेला आहे. सोहराबुद्दिन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमकप्रकरणी त्यांनी तीन महिने कारागृहात काढले आहेत. 25 जुलै 2क्1क् रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 29 ला त्यांची जामिनावर सुटका झाली. परंतु याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना गुजरात प्रवेशासही बंदी घातली होती. एका प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर त्यांना राज्यात परतण्याची परवानगी मिळाली. मोदींनी त्यांना हा वनवास एक उत्कृष्ट संधीच्या रूपात घेऊन उत्तर प्रदेशात जाण्याचा सल्ला दिला. तेथील पक्षाचे घर सावरण्याची जबाबदारी सोपविली.
शिक्षण : बायोकेमिस्ट्री या विषयाचे पदवीधर
ओळख : आधुनिक काळातील चाणक्य आणि निष्णात डावपेचकार
स्टॉक ब्रोकर : संघ परिवारतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते. गुजरात प्रदेश वित्त महामंडळाचे अध्यक्ष
काय केले : 2क्क्2 च्या विधानसभांनंतर शाह यांच्याकडे 1क् विभागांचा कारभार. या वेळी उत्तर प्रदेशात दिलेली लोकसभेची जबाबदारी सांभाळून मोदींचा विश्वास सार्थ ठरविला.
राजकीय वाटचाल
1991 साली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गांधीनगरमधून लोकसभेच्या निवडणुकीत उतरले होते. यावेळी अडवाणी यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी शहा यांना सोपविण्यात आली होती. 1996 साली ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. याही वेळी व्यवस्थापनाची जबाबदारी शहा यांच्यावर होती. संपूर्ण राज्यातील बँकांपासून दुधापर्यत सर्व सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात होत्या. अशा संस्थांवर भगवा फडकविण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली. हे त्यांचे सर्वात मोठे यश होते. सहकारी संस्थांनंतर त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनला आपले लक्ष्य केले. असोसिएशनवर अनेक वर्षापासून काँग्रेस नेत्याचा कब्जा होता. 15 वर्षाची ही एकाधिकारशाही शहा यांनीच मोडून काढली.