शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
2
"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
3
मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...
4
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा
6
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
7
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : धोनी आणि साक्षीची 'संगीत समारंभा'ला हजेरी, Video
8
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
9
Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय
10
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
11
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
12
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
13
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
14
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
16
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 4:37 PM

Vidhan Parishad Election News: मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी आल्याने चुरस वाढली आहे. यामुळे ११ जागा असल्या तरी १२ उमेदवार झाले आहेत. यामुळे मतांचे गणित कोण कसे जुळवणार, असा प्रश्न पडला आहे. नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या किंवा शेकापच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असे सुतोवाच शिंदे गटाने केले आहे. यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होणार आहे. 

मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातही नाराजी आहे. तसेच नार्वेकरांचेही सर्वच पक्षात मित्र आहेत. यामुळे याचा मविआ फायदा उचलण्याची शक्यता आहे. 

सध्याच्या संख्याबळानुसार महायुती त्यांचे ८ उमेदवार निवडून आणू शकते. तर दोन मविआ निवडून आणू शकते. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मते जुळवावी लागणार आहेत. ही मते जुळली तरी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. शिंदेंनी बंड करण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे उद्भवणार असल्याचे भाकीत सरनाईक यांनी केले आहे. 

मविआचे बलाबल...मविआच्या तीन प्रमुख पक्षांकडे ६५ आमदार आहेत. तर त्यांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या अपक्ष आणि मित्र पक्षांकडे ९. तर महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडे भाजप व छोटे मित्रपक्ष ११०, राष्ट्रवादी ४३ आणि शिवसेना ४८ असे एकूण २०१ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला २३ मतांची गरज आहे. हे पाहिल्यास महायुती ८ उमेदवार नक्कीच निवडून आणू शकते. परंतू, तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला ४ मतांची गरज आहे. तर महायुतीला ९ वा उमेदवार जिंकविण्यासाठी ६ मतांची गरज आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण फुटतो, यावर हे गणित ठरणार आहे. नार्वेकरांनी महायुतीची मते फोडली तर महायुतीला ८ जागा जिंकता येणार आहेत. 

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेना