एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 06:51 PM2023-09-25T18:51:29+5:302023-09-25T18:52:08+5:30
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भाजपशी घरोबा केला. यामुळे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आपात्रतेची टांगती तलवार असताना तशीच कारवाई राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी आज एकनाथ शिंदेंच्या प्रकरणावर भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, असे ते म्हणाले आहेत. आमच्या केसमध्ये तसे काही नाहीय. आमची केस पूर्ण वेगळी आहे, त्याचा शिंदेंच्या केसशी काहीही संबंध नसल्याचे पटेल म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. 53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षात निवडणुका झालेल्याच नाहीत. जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील अध्यक्ष एकत्र मिळून पक्षाच्या अध्यक्षाची निवड करतात, असे पटेल म्हणाले.
शिंदेंच्या केसमध्ये आज काय झाले...
शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेवरील सुनावणी आज पार पडली, परंतू याचिकांवरील सुनावणीला काही मुहूर्त मिळत नाहीय असे चित्र आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आली आहे. परंतू, विधानसभा अध्यक्षांनी पुढील तारीख दिली आहे. वाचा सविस्तर...