भावना बाठिया / ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - पुणेकरांना पुण्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो. तो व्यक्त करण्याचे मार्गही अभिनव असतात. अशाच काही हौशी पुणेकर युवकांनी एकत्र येत पुण्याच्या प्रेमापोटी पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे मराठी रॅप बनविले आहे.
स्टारडम एम्पायर हे या हौशी कलाकारांच्या ग्रुपचे नाव आहे. जयराज भिसे, संतोष चौधरी, मनप्रित सिंगगिल,रुणाल पेठे,जसप्रति सिंग, आदेश आंबोरे,मिलिंद आहिरे,अभिनव जयस्वाल, आश्विनी धुमाळ हे या ग्रुपचे सदस्य. सर्वजण १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत.कोणी इंजिनियर आहे तर कोणी फोटोग्राफर. काही महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत. तर काही नोकरी सांभाळून ही आपली कला जोपासतात.
शनिवार वाडा,लाल महाल, पर्वती, सारसबाग,तुळशी बाग, केसरी वाडा,कोरेगाव पार्क, डेक्कन, मंडई,कात्रज या प्रेक्षणिय स्थळांची सफर यांच्या गाण्यातुन करता येणार आहे. या बरोबरच पुण्ेरा पाट्या,पुण्यातील सुप्रसिध्द खाऊ गल्या हे सर्व या माध्यामातुन अनुभवता येणार आहे. मराठी, हिंदी व पंजाबी भाषेचा तडका या गाण्याला लावण्यात आला आहे. या गु्रप मधील युवक-युवती विविध राज्यातुन आलेले आहेत त्यामुळे ही गाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये बनविले आहे.
पुण्यात येणारा प्रत्येकजण पुण्याच्या प्रेमात पडतो. गेली ५-६ वर्ष पुण्यात राहिल्यामुळे पुण्यासोबत एक जिव्हाळ््याच नात निमार्ण झाल आहे आणि या प्रेमापोटी आम्ही हे गाणे बनविले आहे. हे मराठीतल पहिल रॅपसॉँग असेल असे जयराज ने व्यक्त केली.
शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी जस वेळ मिळेल तशी या युवकांची मॉल, बाग किंवा कोणाच्या तरी मैफल जमते आणि सराव सुरु होतो. काही जण सुंदर गिटार वाजवतात, तर काही ड्रम आणि पियानोची साथ देतात. पुण्यातील व बाहेरुन येणाºया इतर युवक-युवतीना त्यांची कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या करता या तरुणानी या गु्रपची स्थापना केली आहे. या गाण्याद्वारे शिवाजी महाराजांचा इतिहास देखाील सादर केला जाणार आहे. यापूर्वी भ्रष्टाचार,स्त्रीभु्रण हत्या या सारख्या ज्वलंत विषयांवर या ग्रुपने अनेक पथ नाट्य सादर केली आहेत. आता पुणेरी गाण्यातुन पुण्याची संस्कृती जगापुढे पोचविण्यासाठी हे गाण हिंदी तही बनविले जाणार आहे.
रॅप म्युझिक म्हणजे काय
रॅप म्युझिक हा अमेरिकेन संगीताचा प्रकार असून यामध्ये ड्रम व इतर वाद्यांवर एखादी कथा संगीताच्या तालावर सांगितली जाते. तरुणाईमध्ये हा लोकप्रिय प्रकार असून हनी सिंग,बाबु सेहगल,मिंका सिंग हे सुप्रसिध्द भारतीय रॅप गायक आहेत.