मुंबई : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी कोरोना लस घेतल्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका वेगळ्याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. (prakash ambedkar criticized pm narendra modi over corona vaccine)
प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज हिंदू निष्ठेचा ढोल बडवत असतात. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा हिंदू परिचारकांवर विश्वास नाही. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी ख्रिश्चन परिचारिकेकडून कोरोना लस घेतली. हे काय वागणं झालं काय'', अशी थेट विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
कोरोना लस घेण्याचे आवाहन
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. एम्समधील नर्स पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोनाची लस दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.
"मोदी आणि योगींना मुलं नाहीत, तुमच्याकडून घेऊन ते कुणाला काय देतील"
पुढील डोस २८ दिवसांनी देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आले. सरांना भेटून खूप छान वाटले. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन कोरोना लस देण्यात आली. आता पुढील डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे, अशी माहिती एम्समधील परिचारिका पी. निवेदा यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांनी कोरोना लस घेतल्याची माहिती मिळाली आहे.