शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

"सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली? घटनेची चौकशी व्हावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 5:01 PM

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

पुणे: सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून त्या ठिकाणी आग लागली नसल्याची माहिती सीरमनं दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सीरममध्ये लागलेल्या आगीबद्दल शंका उपस्थित केला. 'सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला व्हॉट्स ऍप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीदेखील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. 'दीडच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीचं उत्पादन सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झालेली नाही. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात कोरोना लस तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार वाटत आहे', असं टिळक यांनी म्हटलं.सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. मांजरी भागात असलेल्या सीरमच्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजीची लस तयार करण्याचं काम चालतं. कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती  अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. आग लागलेल्या भागात धुराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आग नेमकी कुठे लागली आहे ते समजणं कठीण जात आहे. आग विझवल्यानंतर त्यामागील नेमकं कारण समजू शकेल, असं रणपिसे यांनी सांगितलं. आगीचे धुराचे लोळ खूप लांबवरुन दिसत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMukta Tilakमुक्ता टिळक