मुंबई: एकीकडे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकार पाडण्याची आव्हानं दिली जाता असताना विरोधकांकडून सरकारला तीन चाकी रिक्षाची उपमा दिली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या जुगलबंदीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.राज्य कोरोना संकटातून जात असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यावरून वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,' असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.
"महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे"आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र