एक भूकंप होतो होता थांबला? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:15 PM2023-04-19T23:15:56+5:302023-04-19T23:16:29+5:30

मी सध्या भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे असं आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar, I stand by this statement that there will be 2 political earthquakes in the state | एक भूकंप होतो होता थांबला? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम"

एक भूकंप होतो होता थांबला? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम"

googlenewsNext

मुंबई -  राज्याच्या राजकारणात येत्या १५ दिवसांत २ मोठे बॉम्बस्फोट होणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात प्रवेश करणार या चर्चांवर त्यांनी हे विधान केले होते. मात्र अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा केला. त्यानंतर पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावर मी अजूनही माझ्या विधानावर ठाम असल्याचं स्पष्ट केले. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप होता होता थांबला असं माध्यमांनी म्हटलंय. मी सध्या भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही असं त्यांनी सांगितले.  

कुणालाही अपात्र ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही
सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निकालातून अपात्र होईल असं वाटत नाही. अपात्रतेची जी कार्यवाही होती. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर स्थगिती होती ती उठवली जाईल असं वाटते. राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट भाष्य करणार नाही. राज्यपालांचा निर्णय बदलला जाईल असं वाटत नाही कारण घटना होऊन गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता. राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला स्थगिती दिली होती ते उठवला जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. 

धर्माधिकारी ट्रस्ट कुटुंबाचा, भक्तांसाठी छप्पर बांधू शकले असते
महाराष्ट्र शासन असेल वा ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या दोघांनीही चमडीबचाव असा कार्यक्रम केला. दुपारचा कार्यक्रम असेल तर शेड बांधले जाते, पाण्याची सोय जाते. धर्माधिकारी यांचा ट्रस्ट कुटुंबातील ४ जणांचा आहे. त्यांनी कुटुंबाची संपत्ती कधी जाहीर केली नाही. परंतु मी एवढे सांगतो त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीकडून ते मैदानात छत बांधू शकले असते. पाण्याची सोय नाही हे लक्षात आले. सहजपणे ती सोय सरकार आणि धर्माधिकारी ट्रस्टकडून केली गेली असती. मी भक्तांना एवढेच सांगेन, ज्या ट्रस्टला, तुम्ही लाखो रुपयाचे डोनेशन तुम्ही दिले. त्यांचा सत्कार होताना तुमच्या डोक्यावर छप्पर मिळणार नसेल तर काय उपयोग, सरकारने कार्यक्रमावर जो कोट्यवधीचा खर्च केला त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. 

Web Title: Prakash Ambedkar, I stand by this statement that there will be 2 political earthquakes in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.