शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 21:45 IST

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.

Congress Nana Patole ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्वबळाचा नारा देत अनेक मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सात मतदारसंघांमध्ये मात्र वंचितकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. असं असताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.

वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी वंचितने हा निर्णय घेतला आहे. त्यावर पलटवार करताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध असल्यानेच त्यांना नितीन गडकरी यांच्या पराभवाचं दु:ख होणार आहे, असा हल्लाबोल आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांना पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास कशामुळे नकार दिला, हे आज समोर आलं आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

आंबेडकरांविरोधातील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पटोले उपस्थित राहणार?

वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेसने सुचवलेल्या आणखी पाच मतदारसंघांमध्येही वंचितकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्षाकडून ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील उपस्थित राहू शकतात.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस