काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:29 PM2019-08-01T18:29:14+5:302019-08-01T18:37:06+5:30

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले ...

prakash ambedkars warning to congress | काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने केलाला हा आरोप माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला असून, आम्ही भाजपची बी टीम कसे ? याचा खुलासा करा मग आघाडीची चर्चा करू असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आणि निकालानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. मुस्लीम आणि दलित मतांची विभागणी करून, भाजपला फायदा होण्यासाठीच वंचितची स्थापना झाली असल्याचे काँग्रेस नेते त्यावेळी बोलत होते. मात्र तीच काँग्रेस सोबत येण्यासाठी आता आवाहन करत असल्याचे आंबेडकर म्हणाले. मात्र आमच्यावर 'बी' टीम असल्याच्या आरोपाचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभेत काँग्रेसच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे समजोता होवू शकला नाही. आताही फक्त पत्र व्यवहार पलीकडे काहीच होत नाही. महाआघाडी सोबत जाणार नाही अशी टोकाची अजून भूमिका घेतली नाही. मात्र काँग्रेसने एकतर यावर बोलवा, नाही तर हा विषय थांबवावा असेही आंबेडकर म्हणाले. मात्र 'बी' टीमचा आधी त्यांनी खुलासा करावा, त्यांनतरच पुढील चर्चा होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. 

पक्षप्रवेशावर बोलताना आंबेकर म्हणाले की, आयाराम-गयाराम हे राजकरणात सुरूच असते. त्याने पक्षाला काहीच फरक पडत नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. आतापर्यंत ११०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, ह्या महिन्याच्या शेवटी यादी जाहीर करणार असल्याचे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Web Title: prakash ambedkars warning to congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.