मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये केलेल्या कथित घोेटाळ्याची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे.मेहता हे मंत्री असल्याने नियमानुसार त्यांच्या चौकशीसाठी राज्यपालांची मंजुरी गरजेची ठरते. तशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. ताडदेव एमपी मिल कम्पाऊंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतच्या गृहनिर्माण प्रकल्पात मेहतांनी घोटाळे केल्याचा आरोप करीत पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचे आश्वासन दिले होते.
प्रकाश मेहतांच्या चौकशीला हिरवा कंदिल, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:55 AM