नवी दिल्ली/कोल्हापूर - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारांनंतर अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. खासदार संभाजीराजेंनीही प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. "छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" असे उदगार संभाजीराजेंनी काढले आहेत.फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहताना संभाजीराजे म्हणाले, देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख वाटत आहे. खासदार म्हणून माझी नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून झाली,त्यावेळी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासोबत भेटून चर्चा करण्याची संधी मिळाली.
"छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:35 PM