लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून १६ जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिल्याने आता शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता मावळली आहे. यंदा शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने नवा आदेश काढला होता. त्यानुसार ‘सुगम आणि दुर्गम गावे’ आणि त्यानुसार बदली असे धोरण ठेवले होते. ज्यांनी दहा वर्षे ‘सुगम’ गावांमध्ये काम केले आहे त्यांना सक्तीने ‘दुर्गम’ गावांमध्ये जाणे बंधनकारक होते. याबाबत तालुका पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होऊन २० मेपासून जिल्हा पातळीवरील बदली प्रक्रिया सुरू होणार होती. जिल्ह्णात २००२ शाळा असून त्यातील १३५६ गावे ही ‘सुगम’मध्ये तर ६४६ गावे ‘दुर्गम’मध्ये टाकण्यात आली होती. दरम्यान, शासनाच्या या ‘सुगम’, ‘दुर्गम’ निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेने मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी याबाबत सुनावणी होऊन १६ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली. संघटनेच्यावतीने अॅड. तानाजी मातुगडे यांनी तर सरकारी वकील म्हणून विकास माळी यांनी काम पाहिले. न्या. गडकरी व न्या. बदंग यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोन प्रकारच्या बदल्यांना स्थगितीएकीकडे जिल्हा परिषदेतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांना औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली असताना दुसरीकडे जिल्ह्णातील प्राथमिक शिक्षकांच्याही बदल्यांना स्थगिती मिळाली आहे.
प्राथ. शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती
By admin | Published: May 18, 2017 1:19 AM