शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
2
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
3
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
4
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
5
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

प्रवीण छेडांच्या घरवापसीने सोमय्यांची उमेदवारी धोक्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:12 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला.

मुंबई  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर छेडा यांच्या घरवापसीमुळे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत सोमय्यांना स्थान दिलेले नाही.गुजराती समाजातील वजनदार नेते म्हणून ओळख असणाऱ्या प्रवीण छेडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याबाबत छेडा म्हणाले की, संघपरिवारातूनच माझी वाटचाल सुरू झाली. तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळत होते. ती उमेदवारी सोडून मी भाजपात दाखल झालो आहे. माझ्या परिवारात परत आलो आहे.छेडा यांच्या आजच्या भाजपा प्रवेशामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपा नेतृत्वाकडून सोमय्या यांच्या पर्यायाचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे. सोमय्या यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनोज कोटक आदींच्या नावांचीही चाचपणी पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याचे समजते. त्यातच छेडांच्या भाजपा प्रवेशाने सोमय्यांच्या जागी छेडांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.भाजपा नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजविणाऱ्या छेडा यांनी प्रकाश मेहता यांच्यासोबतच्या वादामुळे २०१२ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यावर त्यांनी पालिकेतविरोधी पक्षनेते पदही भूषविले.२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांकडून त्यांचापराभव झाला होता. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच्या पराग शहांनी त्यांना पराभूत केलेहोते. प्रकाश मेहतांना शहदेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपामध्ये घेतल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक