शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

संभाजी ब्रिगेडसह प्रविण गायकवाड शेकापमध्ये!

By admin | Published: January 10, 2017 4:45 AM

संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत

मुंबई : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. गायकवाड यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडमधील हजारो कार्यकर्ते पुण्यातील शनिवार वाडा येथे १२ जानेवारीला आयोजित केलेल्या कार्यक्रमात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे शेकापचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सत्ता हा महत्त्वाचा पर्याय असल्याने समाजकारणातून राजकारणात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, नचिपण समितीच्या शिफारसी लागू होत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मुंबईत मोर्चा काढून उपयोग नाही. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर गंभीर नाही. त्यामुळेच सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत अन्न, वस्त्र आणि निवारा पूर्ण करणाऱ्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गायकवाड यांच्यासह त्यांच्या तालुका आणि जिल्हा कार्यकर्त्यांना योग्य ती जबाबदारी देऊ, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)