नागपूर : महापौरपदी भाजपा प्रणीत नागपूर विकास आघाडीचे नेते प्रवीण दटके व उपमहापौरपदी अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार विजयी झाले. त्यांनी अनुक्रमे काँग्रेसचे अरुण डवरे व राष्ट्रवादीचे राजू नागुलवार यांचा पराभव केला.
बसपाचे उमेदवार तिस:या क्रमांकावर राहिले. भाजपामधील अंतर्गत स्पर्धेमुळे दटके यांच्या जागी नव्या सत्तापक्ष नेत्याची निवड मात्र होऊ शकली नाही. दटके यांना 8क्, डवरे यांना 39 तर बसपाच्या हर्षला जयस्वाल यांना 9 मते मिळाली.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी 145पैकी 128 नगरसेवकांनी मतदान केले. 4 नगरसेवक अनुपस्थित राहिले तर 13 नगरसेवक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उशिरा सभागृहात पोहोचले. महापौरांनंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 14क् नगरसेवकांनी मतदान केले.