लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे पावसासाठी आवश्यक ढगनिर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी पावसात देशभरात ५ टक्के घट झाली आहे़ १ मार्च ते १८ मे २०१७ दरम्यान देशभरात ९७़८ मिमी पावसाची नोंद झाली़ देशाच्या १०२़७ मिमी या सरासरीपेक्षा ती कमी आहे़ गेल्या दोन-तीन दिवसांत कोकण वगळता राज्यात अन्यत्र पूर्वमोसमी पाऊस झालेला नाही़देशभरातील ३६ हवामान विभागांपैकी केवळ कोकण आणि बिहार या २ विभागांत सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असून ३ विभागांत जादा पाऊस झाला आहे़ ११ विभागांत सरासरीएवढा पाऊस झाला. १३ विभागांत ५९ टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला असून ७ विभागांत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ मार्च आणि एप्रिल महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयारच झाले नाही़ राजस्थान, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आल्याने तेथून येणारे वारे उष्ण व कोरडे होते़ त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती़ तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामध्येही बाष्प नसल्याने पूर्वमोसमी पाऊस कमी झाला़
पूर्वमोसमी पावसात ५ टक्के घट
By admin | Published: May 22, 2017 3:22 AM