पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थातिप केला आहे. आंबिल ओढा कार्यालयाकडून एवढया मोठया प्रमाणात रेशनकार्ड का घेतले जात आहेत, त्यांच्याकडून व्यवस्थित वाटप झाले आहे का याची चौकशी करण्याची गरज अद्याप अन्नधान्य वितरण कार्यालयास वाटलेली नाही.परिमंडळ ह कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ होणे, कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केली नसतानाही कागदपत्रांचे वाटप करणे, सहायक परिमंडळ अधिकार्यांना रेशनकार्डवर सही करण्याचे अधिकार नसताना बेकायदेशीरपणे सहया करून रेशनकार्डांचे वाटप करणे असे असंख्य गैरप्रकार उजेडात आले. यापार्श्वभुमीवर लोकहित फौऊंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून सप्तेंबर २०१३ ते मार्च २०१४ या ७ महिन्यांच्या काळात शहरातील ८ परिमंडळ कार्यालयांना किती रेशनकार्डांचे वाटप याची माहिती घेतली.परिमंडळ ह कार्यालय सरासरी दिवसाला १०० रेशनकार्डांचे वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे आढळून आले आहे. या कार्यालयाकडून पिवळे, केशरी व शुभ्र अशा १६ हजार ३०० रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर इ परिमंडळाने ६ हजार ५५०, फ परिमंडळाने ५३९३, क परिमंडळाने ४ हजार ७५९, अ परिमंडळाने ४ हजार ५५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे. ग परिमंडळ कार्यालयाने सर्वात कमी ६५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे.परिमंडळ कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार अन्नधान्य कार्यालयाकडून त्यांना रेशनकार्ड दिले जाते. मात्र कोणत्या कार्यालयास किती रेशनकार्ड दिले, त्याचा त्यांनी व्यवस्थित लेखाजोखा ठेवला आहे का याची मात्र कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले आहे.जिल्हाधिकारांकडे फाइल प्रलंबितआंबिल ओढा येथील ह परिमंडळ कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ झाल्याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये गैरकारभार झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंबिधत अधिकार्यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे एक महिन्यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला तरी अद्याप जिल्हाधिकार्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. परिमंडळपिवळीकेशरीशुभ्रएकुण५५०३५००५००४५५०२५५००३०० ८२५१००४५५९१००४७५९१००३९०४६००४६०४३००४५५०१७००६५५०४५०४४९३४५०५३९३५०४००२०० ६५०१०००८५००६८००१६३००
अंबिल ओढा कार्यालयाकडून रेशनकार्डांचे बेसुमार वाटप
By admin | Published: May 10, 2014 7:41 PM