’आजवर जम्मू काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते. सध्या जम्मूच्या खो-यातील असंख्य तरुण रोजगाराकरिता भारताच्या कानाकोप-यात जात आहे. जम्मुत जे पिकते ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात आयएमएमच्या माध्यमातून केला जाणार आहे. यातून तेथील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्याकडे विशेष भर देण्यात येणार आहे. असे मत जम्मूच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस ऑफ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मँनेजमेंटपदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.’
1.जम्मूतील आपल्या कार्यक्षेत्राविषयी काय सांगाल?- आयआयएमच्या वतीने आता जम्मुतील वेगवेगळ्या भागांमध्ये नजीकच्या काळात सर्वेक्षण केले जाईल. त्यानुसार कुठल्या भागात नेमक्या कशास्वरुपाचे व्यवसाय उभारणीवर भर द्यावा लागेल याची कल्पना येईल. त्यानुसार सुरुवातीला पायाभुत सोयीसुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 200 एकरच्या जागेत आता कंपाऊडचे काम सध्या सुरु असून पुढील चार वर्षांच्या कालावधीत नवनवीन योजना प्रत्यक्षात आणण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. याच बरोबर शैक्षणिकदृष्ट्या युवकांमध्ये जागरुकता निर्माण करता येईल. व्यवस्थापन प्रशासनाव्दारे तरुणांना उद्योगजकतेचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करणे मुख्य उद्देश आहे.
2. आपल्यापुढे कुठली आव्हाने असतील ?- काश्मिरच्या तुलनेत जम्मुतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुलनेने तितकासा आव्हानात्मक नाही. सध्या कश्मिरमध्ये जी परिस्थिती आहे ती जम्मुत जाणवत नाही. अर्थात यासगळ्यांचे आव्हान आहेच. जम्मुतील तरुणाईला आयआयएमपर्यंत घेऊन येण्याकरिता पुरेसे प्रयत्न करावे लागतील. त्यांच्याकरिता ही मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आयआयएमशी स्वत:ला जोडून घेणे महत्वाचे ठरणार आहे. भविष्यात या ठिकाणी आणखी नवीन कोर्सेस सुरु करायचे असून ते शेतीसंबंधी असणार आहेत. त्यात खासकरुन सफरचंदाच्या ब्रँण्डिंगवर भर दिला जाणार आहे.
* जम्मुतील सफरचंद संपूर्ण भारतात प्रसिध्द आहेत. विविध देशांमध्ये त्याची निर्यात देखील होते. मात्र जम्मुतील तरुणाईला त्या व्यवसायातून जगभर पोहचविण्याकरिता संस्था प्रयत्न करणार आहे. बाजारपेठेचे सतत बदलत जाणारे स्वरुप बघता सफ रचंदाच्या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व मार्केटींगची जोड दिल्यास त्याचा फायदा तरुण व्यावसायिकांना होईल. असे वाटत असल्याची भावना कांबळे व्यक्त करतात. याचबरोबर तेथील कारागिरीला व्यवसायात परिवर्तीत करण्याकरिता आता नवीन पिढीला व्यवस्थापन व उदयोगधंद्याचा दृष्टीकोन समजून सांगावा लागेल. असेही ते म्हणाले. ............देशात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरु नये. दुसरं म्हणजे राज्यातील उदयोगक्षेत्रात बहुजन समाजातील व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग सर्वाधिक आहे. आपण लघु आणि मोठे उद्योगांना कच्च्या स्वरुपात भांडवल पुरविणा-यांचा अभ्यास केल्यास आपल्याला वस्तुस्थिती कळेल. मार्केटींग, सर्विस आणि टेÑड या तिन्ही क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा या वर्गाला होईल. याकरिता प्रयत्न सुरु आहेत. - मिलिंद कांबळे