शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मराठवाड्यात नगदी पिकांना प्राधान्य; खरिपाचा पॅटर्न बदलतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 8:02 AM

पाण्याची उपलब्धता, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीमुळे कापसापेक्षा सोयाबीन, मका, तुरीला जास्त पसंती शेतकऱ्यांतून मिळत आहे.

- योगेश पायघनऔरंगाबाद : मराठवाड्यात खरिपातील पीक पेरणीचा पॅटर्न दिवसेंदिवस नगदी पिकांकडे वळतो आहे. पाण्याची उपलब्धता, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीमुळे कापसापेक्षा सोयाबीन, मका, तुरीला जास्त पसंती शेतकऱ्यांतून मिळत आहे. कमी दिवसांचे पीक घेऊन उन्हाळी पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असून, आता खरिपासाठी शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.सोयाबीनला सर्वाधिक पसंती, मका, हळद लागवडीकडे अधिक कल औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीची लागवड काहीशी कमी होऊन मका, सोयाबीन आणि तुरीच्या क्षेत्रवाढीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. जालना जिल्ह्यात सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्र वाढणार असल्याने परिणामी तूर, कपाशीचे क्षेत्र घटणार आहे.बीडमध्ये सोयाबीन, तूर, लातूरमध्ये तूर, उस्मानाबादेत ऊस, तर परभणी, हिंगोलीत सोयाबीन आणि नांदेड जिल्ह्यात हळदीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता आहे. सरासरी क्षेत्राच्या अंदाजानुसार ८० ते १०० टक्के लागवड प्रत्यक्ष होते. काही लागवड ही शंभर टक्क्यांपेक्षा अधिक होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचा समावेश आहे. सोयाबीनच्या बियाणांची यावर्षी तुटवड्याची शक्यता आहे.  औरंगाबादेत कापसाचे क्षेत्र अधिक असले तरी मका, सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढत आहे. तर, जालन्यात सोयाबीन लागवडीला पसंती देताना दिसत आहे. बीडमध्ये उसाचे क्षेत्र वाढताना सोयाबीनचेही क्षेत्र वाढेल.                - डॉ. दिनकर जाधव, विभागीय कृषी     सहसंचालक, औरंगाबादलातूर, उस्मानाबादमध्ये कापूस कमी होऊन सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढत आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोलीत जिथे पाणी मुबलक आहे अशा परिसरात उसाचे क्षेत्र वाढत असून साखर कारखान्यांच्या क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार उसाच्या पारंपरिक क्षेत्रावर परिणाम जाणवतोय. नांदेडमध्ये हळदीची लागवड वाढताना दिसतेय. कापसावरची बोंडअळी, वाढलेला खर्च यामुळे तुलनेत सोयाबीनला शेतकरी पसंती देत आहेत. २०२१ मधील अंदाजित पीक क्षेत्र  (आकडेवारी हेक्टरमध्ये)जिल्हा    कापूस    सोयाबीन    मका    तूर    बाजरीऔरंगाबाद    ३,९०,८००       १३,३००    १,७९,५९०    ३५,१०१    २९,९३५जालना       २,८८,४५०    १,४५,३००    ४८,९४०    ६,०३०    १४,०००बीड    २,७२,०००    २,९०,०००    १०,०००    ८१,०००    ६०,०००लातूर    ८,०००    ४,५०,०००    ४,५००    ९०,०००    ६००उस्मानाबाद    ७,५००    ३,७४,६००    १३,५००    ६९,५५५    २,६००नांदेड    २,१५,८००    ४,०१,०००    ७००    ७८,०००    ५०परभणी    १,९७,०००    २,४२,०००    ०००    ४६,२५०    ६००हिंगोली    ३२,२९८    ३,६३,३७७    १५०१    ४०,०३९    ०००