शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

गर्भवतीस चुकून गर्भपाताच्या गोळ्या

By admin | Published: June 23, 2017 1:22 AM

गर्भपातासाठी आलेल्या रुग्णाचे औषध परिचारिकेने गर्भवतीस दिल्याने त्या महिलेची मूदतीपूर्व प्रसूती झाली. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे महिलेला झालेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गर्भपातासाठी आलेल्या रुग्णाचे औषध परिचारिकेने गर्भवतीस दिल्याने त्या महिलेची मूदतीपूर्व प्रसूती झाली. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे महिलेला झालेल्या जुळ््या मुलींपैकी एका मुलीचा मृत्यू ओढावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जसलोक रुग्णालयात विरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.कुर्ला येथील डॉ. तरन्नुम वसिफ खान २५ आठवड्यांची गर्भवती होती. जसलोक रुग्णालयात दाखल असताना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गर्भपातासाठी देण्यात येणारी औषधे देण्यात आली. यामुळे त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास प्रसूतीकळा जाणवू लागल्या. त्यावेळेस, शस्त्रक्रियेद्वारे दोन जुळ््या मुलींचा जन्म झाला. परंतु, त्यातील एका मुलीला १९ फेब्रुवारी रोजी अचानक श्वसनास त्रास होऊ लागला आणि त्याच तिचा मृत्यू ओढावला. तर दुसरी मुलगी तीन महिने रुग्णालयात दाखल होती. बाळ आणि बाळंतीणीला एप्रिल महिन्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व घडलेल्या घटनेविरोधात डॉ.खान यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी रुग्णालय प्रशासनाकडे याविषयी डॉ. खान यांनी दाद मागितली होती. परंत, योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पोलीसात तक्रार करण्यात आली. याविषयी रुग्णालयाच्या डॉ.पूर्णिमा सातोसकर यांनी सांगितले की, रुग्णास कोणत्याही प्रकारचे चुकीचे औषध दिले नाही. तपासणीत बाळ आणि मातेची प्रकृती बरी आहे. याप्रकरणी, अंतर्गत चौकशीत कोणीही दोषी आढळले नाही.